मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील गर्कापेठा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता महेश कावरे यांनी आपल्या पक्षाला राम राम ठोकत,भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कामावर विश्वास टाकत भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश केले. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी महेश कावरे यांचा पक्षाचे दुपट्टा टाकून स्वागत केले. महेश कावरे यांचा बी.आर.एस.पक्ष प्रवेशामुळे गर्कापेठा सह परिसरातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे. महेश कावरे हे ज्या पक्षात राहतात त्या पक्षात तो सक्रिय राहून व पक्ष वाढीसाठी काम करीत असतात. महेश कावरे हे सर्वपरिचित चेहरा असून गर्कापेठा गावासह परिसरातील गावांमध्ये त्यांच्या दांडगा जनसंपर्क आहे.
पक्ष प्रवेश वेळी आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, व्यंकटापूर सरपंच अजय आत्राम, गरकापेठा सरपंच सूरज गावडे, मादाराम सरपंच दिवाकर कोरेत, गरकापेठा उपसरपंच वेंकटी दासरी, आविस सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान, आविस सल्लागार विजय रेपालवार, आविस सल्लागार साई मंदा, आविस सल्लागार राजन्ना दुर्गम, व्यंकटापूर माजी उपसरपंच व्यंकटी कारसपल्ली, आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख, आविस सल्लागार दुर्गेश लंबडी, रवी दुर्गम, नागेश जाडी सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…