पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वाकड पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अंमली पदार्थ विक्री व वाहतुक करणारे धंदयांवर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्याच अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अंमलदार यांना अमली पदार्थाबाबत कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील व पोउपनि सचिन चव्हाण यांची गुन्हे प्रकटीकरण पथकाची वेगवेगळी पथके तयार केली. सपोनि संतोष पाटील हे त्यांचे पथकासोबत पेट्रोलींग करीत असताना सपोनि संतोष पाटील यांना विश्वासु बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, तेलंगना राज्यातुन गांजाची विक्री करण्यासाठी एक इसम थेरगाव पुणे येथे येणार आहे. सपोनि संतोष पाटील व स्टाफ यांनी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचला. मिळाले वातमो प्रमाणे बेरगाव चौकी समोरील कैलासनगरकडे जाणारे रोडवर थेरगाव येथे सापळा रचून शयीत इसमास शिताफीने घेराव घालून ताब्यात घेण्यात आले सदर इसमास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव राहुल सावन मलके वय ३३ वर्षे सध्या रा.एस २४/२५२ देवेंद्रनगर, गाजुल रामारम सिकंदराबाद तेलंगणा मुळ गल्ली नं.०९, नारेगाव, सिडको एमआयडीसी जि.संभाजीनगर असे सांगीतले. ताब्यात घेतलेल्या इसमाची रितसर झडती घेतली असता त्याचेताच्यामध्ये एकूण २४ किलो २२४ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आलेने वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ३२५ / २०२३.एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीचे ताव्यामध्ये एकूण २४ किलो २२४ ग्रॅम वजनाचा किं.रु. ३,४०,०००/- चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीची दि. ०६/०४/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त असून चौकशी चालू आहे. सदर आरोपी हा जप्त करण्यात आलेला गाजा तेलंगणा राज्यातून पुण्यात विक्री करता घेवून आल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदर आरोपीचे संपर्कात पुणे व पिंपरी चिंचवड मधील कोण आरोपी आहेत याबाबत तपास चालू आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त, परि २, पिंपरी चिचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त सो बाकड विभाग, पिपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे २ सपोनि संतोष पाटील, सपोनि. संभाजी जाधव, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपफी बाबाजान इनामदार, सपोफी, राजेंद्र काळे, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहया. दिपक सावळे, पोहवा स्वप्निल खतले पोहवा अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पीना, प्रशांत गिलवीले, पोना अतिक शेख, पौना विक्रांत चव्हाण, पोना राग तळपे, पोशि अजय फल्ले, पोशि तात्या शिंदे, पोशि कोर्तय खराडे, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि विनायक घारगे, रमेश खेडकर, पोशि नागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…