75 दिवसाच्या उपचारानंतर आईला बाळ मिळाले..
विक्की डोके भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- आई होणे हा स्त्रीसाठी अत्युच्च आनंदाचा क्षण असतो. बरेचदा हे मातृ सुख लाभले तरी कधी -कधी नवजात बालकांना कावीळ, साखरेचे प्रमाण कमी/ जास्त झालेले, शरिराचे तापमान कमी/ जास्त असलेले, जन्मत:चे व्यंगत्व असलेले, जंतु संसर्ग असेल तर मात्र सुखाचा क्षण दु:खात रूपांतर होतो. मात्र अशा व्यंग असलेल्या, कमी वजनाच्या बाळांसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथील विशेष नवजात केअर युनिट (एस.एन.सी.यु युनिट) वरदान ठरले आहे. याचा अनुभव रिना जांभुळकर यांना आला.
रिना संजीव जांभुळकर यांची प्रसुती 8 डिसेंबर 2022 रोजी भंडाऱ्यातील खाजगी रूग्णालयात झाली. जन्मत: बाळाचे वजन 860 ग्राम होते. अत्यंत कमी वजनाचे व अत्यंत कमी दिवसाचे असल्यामुळे आणि खाजगी रूग्णालयात अशा नवजात शिशुंना भरती करण्याची सोय नसल्यामुळे बाळाला जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे संदर्भीत करण्यात आले. या बाळाला एस.एन.सी.यु कक्षामधील आऊट बॉर्न युनिटमध्ये भरती करण्यात आले. एस.एन.सी.यु मधील डॉक्टरांनी बाळाच्या आई- वडिलांना बाळाच्या प्रकृती विषयी, संभाव्य सर्व प्रकारच्या बाळाच्या वाढीबद्दल होणाऱ्या गुंतागुंतीविषयी पुर्ण समुपदेशन केले.
बाळाला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयु कक्षामध्ये भरती केले तेव्हा बाळाची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. बाळाला रेडियंट वॉरमरमध्ये ठेवण्यात आले, CPAP, Oxyen देण्यात आले, Antibiotic देण्यात आले, Infusion pump द्वारे सलाईन देण्यात आले. दररोज नवजात शिशु केअर देण्यात आली. अशा प्रयत्नानंतर बाळ ऑक्सीजनच्याबाहेर यायला लागले व बाळ केएमसी म्हणजे कांगारू मदर केअर करीता तयार झाले. तब्बल 21 दिवसानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील एसएनसीयु कक्षामध्ये माता व बाळाला एकत्र ठेवण्यात आले. मातेचे पहिले बाळ असल्यामुळे ती फारच संवेदनशील होती तब्बल प्रसुतीच्या 21 दिवसानंतर मातेने आपल्या बाळाला पहिला स्पर्श केला त्यावेळी मातेचा आनंद गगनात मावेनासा झाला. बाळाला एसएनसीयु कक्षामध्ये भरती केले त्यावेळी बाळाची प्रकृती अतिशय खालावलेली होती. बाळाला बालरोग तज्ञांच्या देखरेखीमध्ये तसेच एसएनसीयु प्रोटोकॉलनुसार सर्व नियमांचे पालन करून बाळाला वाचविण्यात आले. बाळाला CPAP, Oxyen देण्यात आले. आईची उब रेडीयंट वॉर्मर द्वारे देण्यात आली, प्रतिजैविके देण्यात आले, फोटोथेरापी, आरओपी, ओएई करण्यात आली, तसेच बाळाला Blood tramsfision देण्यात आले. मधल्या काळात बाळाची प्रकृती जास्तच खालावली असल्यामुळे बाळाचे वजन पुन्हा कमी होऊन ते ६८० ग्राम वर आले होते. बाळाच्या प्रकृती विषयी मातेला वेळोवेळी समुपदेशन करण्यात आले. Vital monitaring करुन आईला बाळा लगतच्या Rediant Warmer जवळ कांगारू मदर केअर ची सोय करण्यात आली. एसएनसीयु कक्षातील टिमच्या अथक प्रयत्नामुळे बाळाच्या प्रकृतीमध्ये हळुहळु सुधारणा होत गेली.
बाळाच्या आईला कांगारू मदर केअर कशी द्यायची, बाळाला कसे पकडायचे याचे महत्व पटवुन देण्यात आले. त्यामुळे मातेचे मनोबल वाढत गेले, बाळाच्या मातेला परत दुध यायला लागले, तिला स्तनपानाविषयी महत्व पटवुन दिले. बाळाची पकड, दुध पाजण्याची पद्धती विषयी प्रात्यक्षित करून सांगितले तसेच मातेला आहार, स्तनपान, स्वच्छता, लसीकरण, Facility and Community Follow-up बाबत समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर तब्बल ७५ दिवसानंतर दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी बाळाचे वजन 1720 ग्राम झाल्यावर बाळाला सुट्टी देवून मातेच्या स्वाधीन करण्यात आले. वैदयकीय उपचारांच्या पराकाष्ठेनंतर बाळाचे वजन 860 ग्रामवरून 1720 ग्राम झाले. या सर्व यशस्वी उपचारांमध्ये डॉ.दिपचंद सोयाम यांच्यासह बालरोग तज्ञ डॉ.नितीन मिसुरकर यांच्या टीमने अहोरात्र प्रयत्न केले.
सामान्य रूग्णालयात एस.एन.सी.यु कक्षात नवजात बालकांच्या साठी आवश्यक त्या सर्व सुविधा आहे. तसेच या कक्षाद्वारे मातांची बाल संगोपनातील भुमीकेविषयी समुपदेशन करण्यात येते: डॉ. दिपचंद सोयाम जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रूग्णालय भंडारा
माझ्या बाळाला एस.एन.सी.यु कक्षाद्वारे मोफत व चांगल्या उपचाराने नविन आयुष्य मिळाले आहे. मी या सर्व डॉक्टर व नर्सेसची आयुष्यभरासाठी ऋणी राहील. रिना जांभुळकर
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…