अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्थानिक लायन्स क्लब आणि इंडियन मेडिकल असोसियेशन यांचे संयुक्त विद्यमाने निशुल्क शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
सर्वांसाठी आरोग्य संकल्पनेवर आधारित या शिबिराच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षपद डॉ. सौ. ज्योत्सना धोटे यांनी भूषविले तर ऍड.पल्लवी मुलमुळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ.संगीता जैन यांनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले.
आधुनिक जीवनशैली,असंतुलित आहार, योग्य व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अनुवांशिकता, प्रदूषण, कमजोर प्रतिकार शक्ती, औषधंचे अतिसेवन या आणि अशा अनेक कारणमुळे कर्करोग बळावतो असा सुरु मान्यवरांनी व्यक्त केला. कर्करोग लक्षान्नाची माहिती करून घेणे आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे असल्याचे नमूद केले.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी कँसर हॉस्पिटल येथील तज्ञाच्या उपस्थितीत जवळपास शंभर व्यक्तींच्या मुख, स्तन, गर्भाशय चाचण्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवम पुण्यानी अध्यक्ष लायन्स क्लब यांनी, स्वागत ऍड.प्रियंका मुलमुळे, संचालन व आभार प्रदर्शन सौ. प्रीती डोईफोडे यांनी केले. या शिबिराच्या आयोजनात डॉ. आशिष चांडक, अध्यक्ष आयएमए, प्रा. डॉ. विलास डोईफोडे, सचिव लायन्स क्लब, डॉ.प्रवीण चव्हाण, कोषाध्यक्ष यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. डॉ.परेश झोपे, डॉ.छत्रपती मानापुरे, हितेश ठक्कर कार्यक्रम प्रभारी होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ.स्वाती पुण्यानी, डॉ.स्वेता चव्हाण, मोनाली बांगरे, डॉ. अंकिता बाहेती, डॉ. गौरी मानकर, डॉ. मोनाली पोटोडे, डॉ. श्रद्धा मनापुरे, डॉ.सौ. जिवतोडे, पियुष झिंजूवाडिया, ऍड.अभिषेक मुलमुळे, डॉ.अमित बाहेती, किशोर सावल, खंगारे, रुकेश मुसळे, प्रवीण टोणपे, सुशांत घटे, मनोज पटेल, वत्सल बांगरे, प्रवीण सावलं, रुपेश जिवतोडे, मिथिलेश बलाखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गरीब रुग्णासाठी अश्या आयोजनाची गरज अनेक उपस्थितांनी व्यक्त केली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…