तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन कोरपना:- तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीच्या कामगारांच्या समस्ये सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भारतीय सिमेंट मजदुर संघाच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे.
यामधे प्रामुख्याने दालमिया सिमेंट कंपनीतील कामगारांच्या वेतनामधे वेज बोर्डनुसार वाढ करण्यात यावी. पूर्व मुरली कामगारांना नोकरीमधे समाविष्ट करण्यात यावे,दालमिया सिमेंट कंपनीच्या परिसरातील उर्वरित स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पूर्व मुरली कामगारांचे १२ कोटी ८६ लक्ष वेतन थकित आहे तेसुद्धा कंपनी प्रशासनाने द्यावे अशी मागणी भारतीय सिमेंट मजदुर संघ, दालमिया सिमेंट कंपनी नारंडा यांचेतर्फे राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, रमेश वेट्टी, राजू गोहणे, सुनील टोंगे, अक्षय भोस्कर, पारस वाढई, सुरेश गाडगे, बंडू हेकाड, बालाजी शिंदे, शंकर कोरांगे,संदीप मडावी उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…