पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- लष्कर पो. स्टे गुरनं ७८/२०२३ भादविक. ३८४, १७०, १८२ या दाखल गुन्हयात पुणे कॅन्टोमेंटचे माजी नगरसेवक यांचेवर पुर्वी दाखल गंभीर गुन्हयाचे अनुषंगाने फिर्यादीस एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलव्दारे फोन करुन “मी एसीपी मुंबई बोलतोय” असे भासवून त्यांचेकडे पुर्वी दाखल गुन्हयात मदत करणेकरीता १५ ते २० लाख रुपयांची मागणी केलेबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. युनिट-२ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील यांना दाखल गुन्हयाचा समांतर तपास करुन, आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. युनिट-२ चे प्रभारी अधिकारी यांनी सपोनि विशाल मोहिते व पोलीस अंमलदार मोहसीन शेख, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण अशी टीम तयार करुन, आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व त्यांचे बातमीदारांमार्फत शोध घेत असताना पोलीस अंमलदार मोहसीन शेख व पुष्पेंद्र चव्हाण यांना सदरचा गुन्हा अमित जगन्नाथ कांबळे, रा. नवी पेठ, पुणे याने केला असलेबाबत निष्पन्न झाल्याने, त्यांस दिनांक ०८/०४/२०२३ रोजी मिळालेल्या बातमी प्रमाणे युनिट-२ पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन ससून हॉस्पिटलचे पाठीमागील राजीव गांधी रोडलगत हनुमान मंदीरा जवळ ताब्यात घेतले आहे..
सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन लष्कर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याने पोलीस, डॉक्टर असल्याची बतावणी करुन पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीत एकुण २० पेक्षा अधिक गुन्हे केलेबाबत तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा.अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा.पो.आयुक्त गुन्हे, श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, राहा. पोलीस निरीक्षक, विशाल मोहिते, पोलीस अंमलदार, संजय जाधव, मोहसीन शेख, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, उत्तम तारु, विनोद चव्हाण, विजय पवार, नागनाथ राख, रेश्मा उकरंडे, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, उज्वल मोकाशी या पथकाने केलेली आहे.
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर पोलीस स्टेशन…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज मकरसंक्रांत असल्यामुळे नागपूरात सर्वत्र…
*(वनश्री महाविद्यालय कोरची येथे लेखक - वाचक संवाद कार्यक्रमाचे आयोजन )* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -…
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर…
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर…