“ अवैधरित्या पेट्रोल / डिझेल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश करुन, हडपसर पोलीसांनी २. कोटी २८ लाख रु. किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- ” हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध पेट्रोल डिझेल चोरीचे अनुषंगाने वपोनी अरविंद गोकुळे हडपसर पोलीस ठाणे यांनी तपास पथक तसेच पोलीस ठाणेकडील अधिकारी व कर्मचारी यांना हजेरीवर सूचना दिलेल्या होत्या. त्याचे अनुसर तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अमलदार अनिरुद्ध सोनवणे, भगवान बर्ड, मनोज सुरवसे, अमोल दणके, रशिद शेख असे दि.०८/०४/२०२३ रोजी पहाटे हडपसर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना, तपास पथकातील पोलीस अमलदार मनोज सुरवसे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “लक्ष्मी कॉलनी, गजानन मित्र १५ नंबर चौक, हडपसर पुणे ” यथे वाशी नवी मुंबई येथून एटीफ पेट्रोल (विमना करीता वापरण्यात येणारे पेट्रोल डिझेल भरून टैंकर शिर्डी एअरपोर्ट कडे जाणार आहेत, सदरचे टैंकर हे कंपनी कडून प्रवासाचा मार्ग वेळ नियोजीत केलेली असताना तसेच सदर टैंकर मधील इंधन बाहेर काढता येवु नये या करीना कंपनीने ऑटो लॉक व सील केलेले असते असे असताना काही इसम हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, रिलायन्स च्या गाडीमधून प्लॉस्टीक कॅन्डमध्ये अवैधरित्या पेट्रोल व डिझेल या ज्वलनशील इंधनाची चोरी करीत आहेत वगैरे बातमी मिळाल्याने सदर बाबतची महती वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद कुळे हडपसर पोलीस यांना कळवून, त्यांचे आदेशान्वये सदर घटना ठिकाणी सकाळी ०६/३० वा सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन एचपीसीएल कंपनीचे टेंकर मधील बॉक्समधुन ताना व सदर ठिकाणी इंधनाने भरलेले १४ पोस्ट न मिळून आले त्यामुळे सरबाबत पुढील कायदेशीर कारवाई करणेकामी एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व परीमंडळचे विभागाचे अधिकारी यांना पत्रव्यवहार करून बोलावून घेतले.

सदर ठिकाणी सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास योनी भेट दिली, सदर घटनेबाबत हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर-५५४/२०२३ भा.द.वि. कलम- ३७९,२८५,३४ सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३.७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून, सदरील अवेध रित्या पेट्रोल चौ चौरी करणारे इसमांची नावे १) सुनिलकुमार प्राननाथ यादव वय २४ वर्षे, धंदा ड्रायव्हर, राहणार- सध्या लक्ष्मी कॉलनी, दत्त मंदिराजवळ, उडपसर पुणे. मुळ राहणार- काळा पुरेबोधराम का पुरवा, पोस्ट- दूल्हपूर काछा, दुल्हेपूर प्रतापगढ़, लालगंज, उत्तरप्रदेश २) दाजीराम लक्ष्मण काळेल वय ३७ वर्ष, धंदा ड्रायव्हर, राहणार- सध्या विठ्ठलनगर, दुर्वाकुर पार्क, हडपसर पुणे मुळ राहणार- मु.पो. बनाई ता. माण, जि. सातारा ३) सचिन रामदास तांबे वय ४० वर्ष धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय राहणार ९५ नंबर विठ्ठलनगर दुबांकुर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे व ४) शास्त्री कवलु सरोज व ४८ वर्ष, धंदा मजुरी, राहणार- सध्या १५ नंबर विट्ठलनगर, दुवांकूर पार्क सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे, हे इसम नामे ५) सुनिल रामदास तांबे वय अंदाजे २८ वर्ष, धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय, राहणार- विङ्कलनगर, दुवांकुर पार्क, सत्वराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे यांचे सांगणेवरून आम्ही टैकरमधून पेट्रोल चोरी करीत असल्याचे सांगितले. हडपसर पोलीसांनी सदर ठिकाणाहून पेट्रोल / डिझेल चोरी करण्याचे साहित्य ०८ पेट्रोलचे टैंकर, १४ पेट्रोल कॅण्ड, इलेक्ट्रिक मोटारपंप वगैरे एकुण किंमत रुपये २,२८.०५.१९५/- चा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आलेला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठाचे आदेशान्वये सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. सौंदय कॉक, मा. सह पोलीस आयुक्त सी. पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विना देशमुख सां, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांच मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अरविंद गोकुळ सारष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे सो पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे सी पानि, (गुरु) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अमलवार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव ,मनोज सुरवसे, अमोल दणके, भगवान बड़े, अनिरुद सोनवणे, रशिद शेख, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, प्रशन टोपे, अतुल पंचरकर, अजित मदन चंद्रकांत रेजितवाड, कुंडलीक केसकर यांचे पथकाने करून कामगिरी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

10 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

22 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

22 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

22 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

22 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

22 hours ago