अवैधरित्या पेट्रोल/डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, हडपसर पोलीसांनी कोट्यवधीच्या मुद्देमाल केला जप्त.

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे मागील अनेक महिन्यांपासून अवैधरित्या पेट्रोल/डिझेल चोरी सुरू होती त्या चोरीचा पर्दाफाश करत हडपसर पोलीसांनी कोट्यवधीच्या मुद्देमाल केला जप्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे.

हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध पेट्रोल/डिझेल चोरीचे अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे हडपसर पोलीस ठाणे यांनी तपास पथक तसेच पोलीस ठाणे मधील अधिकारी व कर्मचारी यांना हजेरीवर सूचना दिलेल्या होत्या. त्याचे अनुषंगाने हडपसर तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमर शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार अनिरूध्द सोनवणे, भगवान हंबर्डे, मनोज सुरवसे, अमोल दणके, रशिद शेख असे दि.०८ एप्रिल रोजी पहाटे हडपसर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोज सुरवसे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “लक्ष्मी कॉलनी, गजानन मित्र मंडळाळजवळ, १५ नंबर चौक, हडपसर पुणे.” येथे वाशी नवी मुंबई येथुन एटोफ पेट्रोल (विमना करीता वापरण्यात येणारे पेट्रोल डिझेल भरुन टैंकर शिर्डी एअरपोर्ट कडे जा आहेत, सदरचे टैंकर हे कंपनी कडुन प्रवासाचा मार्ग वेळ नियोजीत केलेली असताना तसेच सदर टैंकर मधील इंधन बाहेर काढता येवु नये या करीता कंपनीने ॲटो लॉक व सोल केलेले असते असे असताना काही इसम हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, रिलायन्सच्या गाडीमधून प्लॉस्टीक कॅन्डमध्ये अवैधरित्या पेट्रोल व डिझेल या ज्वलनशील इंधनाची चोरी करीत आहेत वगैरे बातमी मिळाल्याने सदरबाबतची माहीती वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद गोकुळे हडपसर पोलीस ठाणे यांना कळवून, त्यांचे आदेशान्वये सदर घटना ठिकाणी सकाळी ०६/३० वा चे सुमारास छापा टाकला असता, सदर ठिकाणी दोन एचपीसीएल कंपनीचे टँकर मधील वॉल बॉक्स मधुन इंधन काढताना व सदर ठिकाणी इंधनाने भरलेले १४ प्लॅस्टीकचे कॅन मिळुन आले. त्यामुळे सदरबाबत पुढील कायदेशीर कारवाई करणेकामी सबंधित एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व परीमंडळचे विभागाचे अधिकारी यांना पत्रव्यवहार करून समक्ष बोलावून घेतले.

सदर ठिकाणी सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे यांनी तात्काळ भेट दिली, सदर घटनेबाबत हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर- ५५४/२०२३ भा.द.वि. कलम- ३७९, २८५, ३४ सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३.७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदरील अवैध रित्या पेट्रोल ची चोरी करणारे इसमांची नावे १) सुनिलकुमार प्राननाथ यादव वय २४ वर्ष, धंदा ड्रायव्हर, राहणार- सध्या लक्ष्मी कॉलनी, दत्त मंदिरा जवळ, हडपसर पुणे. मुळ राहणार-काछा पूरेबोधराम का पुरवा, पोस्ट- दूल्हेपूर काछा, दुल्हेपूर प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश २) दाजीराम लक्ष्मण काळेल वय ३७ वर्ष, धंदा ड्रायव्हर, राहणार सध्या विठ्ठलनगर, दुर्वाकुर पार्क, हडपसर पुणे मुळ राहणार- मु.पो. वळई ता. माण, जि. सातारा ३) सचिन रामदास तांबे वय ४० वर्ष, धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय राहणार १५ नंबर विठ्ठलनगर, दुर्वांकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे. व ४) शास्त्री कवलु सरोज वय ४८ वर्षे, धंदा मजुरी, राहणार- सध्या १५ नंबर विठ्ठलनगर, दुर्वांकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे. हे इसम नामे- ५) सुनिल रामदास तांबे वय अंदाजे ३८ वर्षे, धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय राहणार विठ्ठल नगर, दुर्बाकूर पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठी मागे पुणे. यांचे सांगणंवरुन आम्ही टँकरमधून पेट्रोल चोरी करीत असल्याचे सांगितले. हडपसर पोलीसांनी सदर ठिकाणाहून पेट्रोल/डिझेल चोरी करण्याचे साहित्य ०८ पेट्रोलचे टैंकर, १४ पेट्रोल कॅण्ड, इलेक्ट्रिक मोटारपंप वगैरे एकुण किंमत रुपये २,२८,०५,९९५/-“(दोन कोटी अठ्ठाविस लाख पाच हजार नउशे पचांनो रु) चा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आलेला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठाचे आदेशान्वये सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे, बरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, दिगंबर शिंदे सो, पॉनि (गुन्हे) विश्वास डगळे, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलोस अंमलदार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, मनोज सुरवसे, अमोल दणके, भगवान हंबर्ड, अनिरूध्द सोनवणे, रशिद शेख, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, कुंडलीक केसकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

6 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

18 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

18 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

18 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

18 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

18 hours ago