महाविद्यालयाच्या प्रशासनिक कार्यालया समोर संविधानिक पद्धतीने दिनांक 27 मार्च 2023 पासून अनिश्चित काळा करिता सत्याग्रह सुरु
प्रशांत जगताप संपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय वर्धा (महाराष्ट्र) मधील पीएचडी विध्यार्थी रजनीश कुमार आंबेडकर यांनी आपला पीएचडी शोध-प्रबंध मूल्यांकन करण्या करिता 26 मे 2022 ला महाविद्यालयात सबमिट केले. विध्यार्याच्या म्हणण्यानुसार शोध-प्रबंधाचे मूल्यांकन करण्या ऐवजी जमा करण्याच्या 3 महिने 11 दिवसा नंतर शोध-निर्देशक बदलविण्याची प्रक्रिया त्या विभागा द्वारा करण्यात आली. जेव्हा की शोध-प्रबंध 15 दिवसाच्या आत मूल्यांकन करण्या करिता पाठवण्याची तरतूद आहे. त्या विध्यार्थ्यासोबत नियम व अटीचे पालन न करता विभाग अध्यक्ष मार्फत जातीगत भेदभाव करून पीएचडी शोध प्रबंधामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी काढून त्याच्यावर अन्याय केला गेला. त्यामुळे अशा मानसिकतेच्या शिक्षकावर अनुसूचित जाती, जनजाती (अत्याचार विरोधक अधिनियम -1989 नुसार) कायदेशीर कार्यवाही केली जावी असे निवेदन आंबेडकरवादी संघटनांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली.
आज पर्यंत महाविद्यालयाच्या वतीने अनेक आदेश काढून त्या विध्यार्थीला शैक्षणिक, मानसिक, आर्थिक त्रास देण्याचे काम या महाविद्यालयाच्या वतीने सुरु आहे. त्या विध्यार्थीच्या वतीने आपले पीएचडी शोध-प्रबंध मूल्यांकन करण्या करिता विश्व विद्यालया पासून तर यूजिसी पीएमओ, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रपती कार्यालय, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली येथे ऑनलाईन माध्यमातून आपल्याया न्याय द्यावा या करिता विनंती करण्यात आली, परंतु आजपर्यंत त्याला न्याय देण्यात आला नाही. या कारणास्तव या विध्यार्थीने महाविद्यालयाच्या प्रशासनिक कार्यालया समोर संविधानिक पद्धतीने दिनांक 27 मार्च 2023 पासून अनिश्चित काळा करिता सत्याग्रह सुरु केले, परंतु 31 मार्च 2023 ला विश्व हिंदी महाविद्यालयातील प्रशासन व काही मनुवादी विध्यार्थी संघटनानी त्यांच्यावर हिंसक पद्धतीने हल्ला करून सत्याग्रह संपवण्याचा कट आणि मुख्य विषया पासून लक्ष भटकविण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्या मुळे 2 विद्यार्थी अति गंभीर जखमी झालेत.
त्यामुळे ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा, युवा दि रिफॉर्मिस्ट युथ असो. वर्धा तथा तमाम बहुजन संघटना यांनी एकत्र येऊन वर्धा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन दिले की, रजनीश कुमार आंबेडकर या विध्यार्थीचा पीएचडी शोध-प्रबंध मूल्यांकन करून त्याला ती उपाधी बहाल केली जावी व सत्याग्रह योग्य रीतीने सुरु राहण्या करिता त्या विध्यार्थीना संरक्षण देण्यात यावे तसेच ज्या संघटनाना, विध्यार्थी ज्यांनी यांच्या वर असंविधानिक पद्धतीने हल्ला केला त्या विध्यार्थीनवर कायदेशीर फौजदारी कार्यवाही केली जावी.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…