सांगलीतील ऐतिहासिक ११६ वर्ष जुनी सांगली हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा २५ जुन २०२३ रोजी आयोजित.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील ऐतिहासिक वास्तू लाभलेली सांगलीतील ११६ वर्ष जुनी असलेली शाळा म्हणजे सांगली हायस्कूल. या शाळेने लाखो विद्यार्थी घडवले.त्यातील हजारो विद्यार्थी किर्तीवंत नामवंत झाले. यामध्ये हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर, उद्योगपती आबासाहेब गरवारे, क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, कबड्डीपटू शंकर गावडे अशी नांवे घेता येतील.

आजही या शाळेचे माजी विद्यार्थी भारतातील विविध क्षेत्रात शिखरावर पोचलेले दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने अर्जुन पुरस्कार प्राप्त राजू भावसार, सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक एम.एन. नवले, सांगलीतील जेष्ठ नेत्रतज्ज्ञ डाॅ. दिलीप पटवर्धन, बाॅम्बे हाॅस्पिटल मधील प्रसिद्ध न्युरालाॅजीस्ट डाॅ. सतीश खाडिलकर डाॅ.वामन खाडिलकर बाल चिकित्सक, हायसम्राट अजितकुमार कोष्टी व नुकतीच पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी झालेली प्रतीक्षा बागडे अशी नांवे घेता येतील.

या व्यतिरिक्त असंख्य व्यापारी, इंजिनिअर, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी या शाळेने घडवले आहेत. शाळेवर सोन्याचा कळस असलेली हि एकमेव इमारत आपल्या ब्रिटीश कालावधीत निर्माण होण्याची साक्ष देतेच पण शाळेच्या आवारातील चिंचेचे झाड आपल्या शाळेतील कित्येक आठवणींची साक्षीदार आहे. टेक्निकल विभाग सुरू करणारी हि शाळा. शाळेचे १९६२ पासूनचे सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मेळावा रविवार दिनांक २५ जुन २०२३ घेणार आहेत. हा मेळावा सांगली हायस्कूलच्याच क्रीडांगणावर सकाळी ८ पासून सुरू होईल.
दिवसभरात पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे हिचा सत्कार तसेच शाळेचे माजी कबड्डीपटू यांच्यातील सामना तसेच माजी विद्यार्थ्यांच्याकडून कलागुण सादर करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने गायन, नृत्य, फनी गेम्स याबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमानी दिवस रंगणार आहे.

यावेळी सकाळचा नाश्ता व चहा, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा असा अखंड दिवस हा मेळावा भरणार आहे. या मेळाव्यास सर्व नामांकित माजी विद्यार्थी हजर रहाणार आहेत. या मेळाव्यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच महापालीका आयुक्त यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती मेळाव्याच्या आयोजन समितीने दिली आहे. तसेच ज्या माजी विद्यार्थ्यांनी अजुनही आपला उपस्थिती फाॅर्म भरला नसेल तर त्यांनी अधिक माहितीसाठी ९७३०३०५४५७ या नंबरवर संपर्क साधावा असे अवाहन करण्यात येत आहे. उपस्थित व्यक्तीमध्ये १९६२ चे धोंडे सर, १९६७ चे अशोक पाटील, १९७१ चे भेंडवडे,१९७५ चे अनिलभाई सामाणी, १९७९ चे सुनिल माने, १९८० चे चंद्रशेखर पटवेगार, १९८३ चे राजेंद्र माळी व सुनिल गवळी, १९८४ चे प्रशांत माने व मिलिंद चौधरी, १९८५ चे धर्मेंद्र खिल्लारे, १९८६ चे मोहन वाघ आणि आयुब मुल्ला, १९९४ चे सतिश सवदे तसेच सांगली हायस्कूल चे उपमुख्याध्यापक व्हावे सर आणि उपप्राचार्य शशिकांत ऐनापुरे उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

21 hours ago