उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौध्द धम्म संस्कार संघ व श्रावस्ती विहार सांगली यांच्या वतीने दि. 09 एप्रिल रोजी महिला अत्याचारावरील सामाजिक, प्रबोधनात्मक, उत्कृष्ट सावित्रीच्या लेकी पथनाट्य अथर्व गारमेंट मिरज येथे सादर करण्यात आले. या पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन विजय लांडगे यांनी केले. यावेळी या पथनाट्यात विहारातील महिला व मुलींनी उस्फुर्तपणे सहभाग घेऊन हे नाटकाचे उत्तम सादरीकरण केले.
सांगली शहरातील श्रावस्ती विहाराच्या रणरागिणी महिला उपासिका सादर केलेले पथनाट्य, “सावित्रीच्या लेकी” यातील कलाकार खालील प्रमाणे दिपाली कांबळे (संचालिका) – मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत, शैलजा साबळे (संचालिका) – प्रियकराच्या भूमिकेत, चेतना नागवंशी -मुलींची आईच्या भूमिकेत, रूपाली बनसोडे – प्रेयसीच्या भूमिकेत, सपना भिसे, मुलीच्या भूमिकेत, दीक्षा पवार- मुलाच्या भूमिकेत, मोहिनी नरवाडे- मुलाच्या वडिलांच्या भूमिकेत, सांची कांबळे- सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत, प्रियंका कांबळे – डान्स कलाकार, पथनाट्य संकलन लेखन दिग्दर्शन- विजय लांडगे यांनी अद्भुत अशा अभिनय केला.
आज देशात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज माता सावित्रीचा आदर्श सर्वांनी घ्यावा. यासाठी ही नाटिकासादर करण्यात आली. सदरची नाटिका अंगावर शहारे आणणारी होती.
यावेळी अरुण कांबळे सर, नागवंशी सर, श्रावस्ती विहाराचे सचिव पवन वाघमारे, विकास भिसे, सूरज कांबळे, सिद्धार्थ पवार उपस्तिथ होते. अथर्व गारमेंटचे दीपक कांबळे, तृप्ती मॅडम यांनी खूप चांगले सहकार्य केले. तसेच गारमेंट मधील सर्व कर्मचारी वर्ग यांनी सुद्धा सहकार्य केले त्याबद्दल आयोजकांकडून त्याचे विशेष आभार मानण्यात आले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…