पाण्याच्या 11 टाक्या सुरु करत 365 दिवस पाणी पुरवठ्याची मागणी.
150 कोटी रुपयांच्या अमृत योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी.
मोर्चात हजारोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसकार्यकर्त्यांचा व स्थानीक नागरिकांचा सहभाग.
✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याचा प्रश्न हिंगणघाट शहरात पेटू लागला आहे. हिंगणघाट शहरातील अनेक भागांमध्ये पाण्यासाठी बोंबाबोंब आहे. नगरपालिका प्रशासनाचा निषेध करत राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून हिंगणघाट शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी चक्क टँकर वर बसून नगर पालिका प्रशासन व भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आठवडी बाजार एकूण या मोर्चाची सुरुवात करण्यात आली असून हिंगणघाट शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा नगरपालिकेत धडकला. गंगा शहरामध्ये दीडशे कोटी रुपयांच्या अमृत योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाला असून नव्याने उभारण्यात आलेल्या अकरा टाक्याच्या माध्यमातून ताबडतोब पाणीपुरवठा सुरू करावा व जनतेची तहान भागवावी अशी मागणी यावेळेस मोर्चातून करण्यात आले. करोड रुपये खर्च करून तयार केलेल्या पाईपलाईन व मल नित्सरन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे. हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड, रामनगर वार्ड ,संत तुकडोजी वॉर्ड, शहा लंगडी रोड रिठे कॉलनी या परिसरामध्ये आत्ताच पाणीटंचाई हसू लागली असून नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागते आहे. पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून आताच लोकांना पाणी विकत घ्यावा लागत आहे. एकीकडे नगरपालिका प्रशासन हे 365 दिवसाचा पाण्याचा कर घेत असताना प्रत्यक्षात 140 दिवस पाणीपुरवठा करत असल्याने नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब 365 दिवस पाणीपुरवठा सुरू करावा व सर्व 11 पाण्याच्या टाक्यातून पाणी पुरवठा करत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…