हिंगणघाट मधील पिली मस्जिद ते वना नदी पर्यंत मोठा नालाचे बांधकाम करा: शिवसेना (शिंदे गट) ची मागणी.

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नैसगिक आपत्ती आली कि त्यावर मात तर करू शकत नाही परंतु मानव निर्मित वस्तू तयार करून त्यावर नियंत्रण करू शकतो तसे या ठिकाणी आहे. गेला वर्षी अति पाऊसामुळे हिंगणघाट मधील जुनी वस्ती मध्ये लोकांचा मालमत्तेचे खूप नुकसान झाले. अति वृष्टीमुळे धरण भरली आणि हिंगणघाट शहर मधील नाल्यात येणारे सांड पाण्यामुळे दाब निर्माण झाली यावर सविस्तर निरक्षण करून जेव्हा खूप पाणी आले कि धरणे भरून नदी भरून नाले भरून जात होते यामुळे पाणी स्थिर रहाचे म्हणजे पाणी समोर नाही जाने अशी परिस्थिती उत्पन्न झाली कि धरणाचे पाणी सोडले जात होते आणि नदीला पूर यायचे यामुळे हिंगणघाट शहर मधील सांड पाणी कुठे जायचे? कारण शोधता हिंगणघाट शहरात मोठा नाला 12 फुटाचा तो पिली मस्जिद पर्यन्त आहे आणि पिली मस्जिद ते वना नदी पर्यन्त 4 फुटाचा नाली असल्यामुळे त्या ठिकाणी दाब जास्ती झाला कि , शहरातून येणारे सांड पाणी 12 फुटाचा मोठा नाल्यातून पाणी 4 फूटाचा नाली मधून कसा जाणार ही खरी समस्या या ठिकाणी निर्माण होते.

नदीला पूर आला की या नाल्याचे पाणी हिंगणघाट शहरातून जुनी वस्ती विठ्ठल मंदिर वॉर्ड, गाडगे बाबा चौक , तेली पुरा चौक, डांगरी वॉर्ड आणि दोन तोंड्या नाळ्या कडे पाणी पसरत जातो आणि त्या ठिकाणी राहणारे लोकांचा घरात पाणी गेल्यावर त्यांचा मालमत्ते खूप नुकसान होते.
या करिता शिवसेना ची अशी मागणी आहे कि भविष्यात लोकांचा मालमत्तेचे नुकसान झाले नाही पाहिजे या करिता पिली मस्जिद पासून ते वना नदी पर्यंत 12 फुटाचे मोठा नालाचे लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावे या करिता मुख्यधिकारी साहेब हिंगणघाट नगरपालिका यांना निवेदन दिले यात प्रमुख उपस्थिती उपजिल्हा प्रमुख श्री रवीभाऊ धोटे, सौं धनश्री क्षीरसागर महिला उपजिल्हा प्रमुख,श्री महेश मुडे युवासेना उपजिल्हा प्रमुख,श्री अमित भाऊ गावंडे तालुका प्रमुख,श्री प्रफुल क्षीरसागर शहर प्रमुख श्री मुकेश चौधरी शहर संघटक,श्री देवाभाऊ शेंडे उपशहर प्रमुख, श्री मनोज कोटकर उपशहर प्रमुख, श्री प्रशांत कंडे विभाग प्रमुख,श्री संजय जुमडे विभाग प्रमुख, सेवक खैरे प्रशांत वीरूळकर, सचिन मिठोले,प्रमोद जुमडे,मंगला खराटे, रेणू खेकडे, अनिता वैरेकर यादी उपस्थिती असून वॉर्डातील 100 लोकांनी निवेदन मध्ये सही केली.
मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

5 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

17 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

17 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

17 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

17 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

17 hours ago