मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 196 व्या जयंती हिंगणघाट शहरात सालाबादप्रमाणे यंदाही महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या नंदोर चौक परीसरात असलेल्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व महात्मा फुले यांच्या जयंतीच्या तमाम भारतीयांना शुभेच्छा देण्यात आल्या.
हिंगणघाट शहरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जयंती साजरी करण्यात आली. सकाळ पासून स्थानीय नंदोरी चौक येथील महात्मा जोतीबा फुलेच्या पुतळ्या समोर शहरातील नागरिकांनी मेणबत्ती लावून आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रसंगी माजी नगरसेवक अनिल भोंगडे यांनी ज्योतिबाच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आणि त्यांनी दलीत आणि महिला ना शिक्षित करण्यासाठी केलेल्या कार्याचे महत्त्व विषद केले. डॉ. बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव अनिल जवादे यांनी ज्योतिबानी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केलेल्या कार्यमुळे आज मानवाला मानव म्हणून जगता येत असल्याचे प्रतिपादन केले. योगेश वानखेडे यांनी त्याची थोरवी कथन करताना पुतळ्या भोवतीचां परिसर स्वच्छ आणि परिसराच सौंदर्यीकरण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी विठ्ठल गुलघाने, संतोष तीमांडे, कविता मुंगले इत्यादींनी विचार मांडले. कार्यक्रमा चे संचालन किशोर तीतरे यांनी तर आभार अनिल कडू यांनी मानले. या अभिवादन सोहळ्यास प्रा सुरेश पांगुळ, संदेश मुन, डॉ. रमेश लोंढे, गणेश काटवले, रमेश झाडे, कृष्णा मूंगले रुपेश लाजुरकर, सुरेश टेभूर्णे आणि गणमान्य नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…