सौ.हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात एकूण 5 लक्ष 9 हजार 205 झेंडे फडकविण्यात आले. यात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची घरे, शासकीय व निमशासकीय इमारती तसेच इतर खाजगी कार्यालय व दुकानांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात फडकविण्यात आलेल्या 5 लक्ष 9 हजार 205 झेंड्यांमध्ये एकूण घरांची संख्या 4 लक्ष 82 हजार 675 आहे. यात ग्रामीण भागातील घरे 3 लक्ष 12 हजार 484 तर शहरी भागातील घरे 1 लक्ष 70 हजार 194 आहे. तसेच शासकीय आणि निमशासकीय एकूण इमारती 4,766 असून यात ग्रामीण भागातील 3,798 आणि शहरी भागातील 908 इमारती, तर जिल्ह्यातील खाजगी कार्यालय आणि दुकानांची एकूण संख्या 21,534 आहे. यात ग्रामीण भागातील 1,332 आणि शहरी भागातील 21,534 खाजगी कार्यालय आणि दुकानांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 15 तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण 3 लक्ष 17 हजार 614 झेंडे फडकविण्यात आले. यात शासकीय निमशासकीय इमारती 3,798 घरांची संख्या 3 लक्ष 12 हजार 484 तर इतर खाजगी कार्यालय आणि दुकानांची संख्या 1,332 आहे. तसेच चंद्रपूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा व सात नगरपंचायती क्षेत्रातील शहरी भागात एकूण 1 लक्ष 91 हजार 591 झेंडे फडकविण्यात आले. यात शहरी भागातील शासकीय निमशासकीय इमारतींची संख्या 968, घरांची संख्या 1 लक्ष 70 हजार 191 आणि इतर खाजगी कार्यालय व दुकानांची संख्या 20 हजार 432 आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…