मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 एप्रिल 2023 रोज गुरुवारला हिंगणघाट नगरपरिषद येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने हिंगणघाट विविध प्रश्नाला घेऊन हिंगणघाट नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
हिंगणघाट शहरात अमृत योजनेअंतर्गत 2016 – 17 या कालावधीत भाजपाचे नगराध्यक्ष प्रेम बसंताणी तथा आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले होते व ते काम पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षाचा होता. या योजनेतील नवीन नळ कनेक्शनसह पाईपलाईन, 11 टाक्या तसेच फिल्टर प्लांट सहित पूर्ण करून द्यायचे होते. भूमिगत गटार व्यवस्था या शहरासाठी नालीचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटारी व्यवस्थेचे काम दोन वर्षात पूर्ण करून द्यायची होती. परंतु कालावधी संपून झाला तरी काम पूर्ण झाले नाही. नंतर त्यांना प्रशासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली. परंतु 2022 पर्यंत सुद्धा ही योजना पूर्ण करण्यात आलेली नाही. त्या योजनेचे लोकार्पण कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिनांक 12 डिसेंबर 2021 ला तत्कालीन नपा चे मुख्याधिकारी अनिल जगताप तथा लोकप्रतिनिधी आमदार समीर कुणावार, नगराध्यक्ष प्रेम बसंताणी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
परंतु झालेले लोकार्पण सोहळा हा लोक मतानुसार लोकार्पण म्हणजे त्या योजनेचे काम पूर्ण होऊन ते जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध झाल असं तरी सर्वसाधारण जनतेचा समज आहे. तरी सन 2022 व 2023 येऊन सुद्धा ते काम अपूर्ण आहे मग या लोकार्पण सोहळ्याचा अर्थ काय? या लोकार्पण सोहळ्यासाठी जो खर्च झाला, त्या खर्चाचं उत्तर कोण देईल? कारण तो जनतेचा पैसा आहे. यावरून असे लक्षात येते की, त्यावेळेस येणाऱ्या संभाव्य सार्वत्रिक नगर परिषद निवडणुका लक्षात घेता हा लोकार्पण सोहळा तातडीने व घाई गडबडीने उरकवून घेण्यात आला. असा जनतेचा समज झालेला आहे.
सन 2022 मध्ये शिवसेना हिंगणघाट यांना असे लक्षात आले की, ही योजना आता पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित नसताना सुद्धा या योजनेचे लोकार्पण कसे काय घेण्यात आले आहे? म्हणून शिवसेने द्वारा उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 2 मार्च 2022 रोजी निवेदन देऊन या हिंगणघाट शहरातील प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 6, 18 तसेच सर्व शहरात पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. असे निवेदनातून अवगत केले होते. नंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी खासदार अनंत गुढे, तथा जिल्हाप्रमुख अनिल देवतारे व इतर सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत नपा मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट यांना दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी या हिंगणघाट शहरात भीषण पाणी टंचाई बद्दल निवेदन देण्यात आले. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले कि या भीषण पाणी टंचाईवर नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून आम्ही शहरवासीयांना पाणी देण्याकरिता पाण्याचे टँकर लावतो आहे तरी पाणी टँकर लावण्यात आले नाही आणि आम्हाला आश्वासन दिले कि सदर योजना ही कुठल्याही परिस्थितीत जून महिन्या पर्यंत पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी कार्यान्वित करू असे दिनांक 8 एप्रिल 2020 रोजी लेखी पत्र देऊन आश्वासित केले. तरीसुद्धा काम पूर्ण न झाल्यामुळे शिवसेना हिंगणघाट द्वारे पुनश्च नपा मुख्याधिकारी यांना दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी निवेदन देण्यात आले. परंतु सदर निवेदनाला केराची टोपली दाखवून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच परत पक्षाचे तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक सतीश धोबे यांनी आपले दिनांक 22 डिसेंबर 2022 ला नपा मुख्याधिकारी यांना परत स्मरण पत्र लिहिले व कामाबद्दल विचारणा केली .परंतु कुठल्याही प्रकारचे उत्तर या प्रशासनाकडून देण्यात आले नाही.
शिवसेना या पक्षाला शहरातील जनता या पाणीटंचाई मुळे त्रस्त असल्याचे लक्षात येताच पुनश्च शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 6 एप्रिल 23 रोजी निवेदन देऊन आताच्या परिस्थितीत कुठल्या कुठल्या प्रभागात किती कामे प्रलंबित आहे. याची सूची या निवेदनाच्या मार्फत देण्यात आली आहे. तसेच मुख्याधिकारी नगर परिषद यांना सुद्धा त्या निवेदनाची प्रत देण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांना सुद्धा निवेदनाची प्रत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आली.
त्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे होते की, जर आमच्या या रास्त मागण्या या दिनांक 12 एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण न झाल्यास आम्ही दिनांक 13 एप्रिल 2023 या तारखेला उपोषणाला बसणार आहोत. असे स्पष्ट संकेत दिले असताना सुद्धा, मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही त्यामुळे शिवसैनिक पदाधिकारी व महिला आघाडी युवासेना तथा विविध प्रभागातून आलेल्या महिला मंडळी नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्या दालनात 11:00 वाजता जिल्हा समन्वयक डॉ. उमेश तुळसकर, चंद्रकांत घुसे माजी नगराध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, शहरप्रमुख सतीश ढोमणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. जवळपास 12 वाजेपर्यंत त्यांच्या दालनात कुठल्या अधिकारी उपस्थित होऊ शकला नाही. जवळजवळ बारा-साडेबारा वाजता मुख्याधिकारी यांचे दालनात आगमन झाले. यावेळी त्यांना घेराव घातला व ठिय्या आंदोलन सुरू केले.
यावेळी आंदोलन कर्त्याच्या सगळ्या मागण्या मुख्याधिकारी यांनी ऐकून घेतल्या व प्रभाग क्रमांक तीन व चार चे काम व इतरही प्रभागाचे काम प्रलंबित आहे असे मौखिकरित्या त्यांनी सांगितले. तरी मी स्वतः मुख्याधिकारी म्हणून सदर काम एक ते दीड महिन्यात पूर्ण करून देतो असे आश्वासित केले. परंतु आमचे मन समाधान झाले नाही. कारण जनता या शहराची पाण्यापासून त्रस्त झालेली आहे त्यांना नळाचे पाणी मिळत नाही. नंतर त्यांनी प्रभाग क्रमांक 3 व 4 या ठिकाणी तसेच प्रभाग क्रमांक 18 या ठिकाणी पाणी देण्याची दिनांक 19 एप्रिल 2023 रोज बुधवार पर्यंत कार्यान्वित करून सुरू करतो असे आश्वासन त्यांनी त्या प्रभागातले बंटी वाघमारे, भास्कर ठवरे, मोहन तुमराम व त्या प्रभागातील इतर महिला मंडळ व शिवसैनिकांना दिले. आमच्या पक्षाच्या वतीने त्यांच्या या दिलेल्या लेखी व मौखिक आश्वासनाने, आम्ही सध्याचे हे आंदोलन स्थगित ठेवून पुढे जर हे बुधवार पर्यंत काम झाले नाही तर, गुरुवारपासून परत आम्ही त्यांच्या दालनात व नगरपरिषद समोर आंदोलन करण्यात येईल. शिवसेनेतर्फे प्रकाश अनासाने उपतालुकाप्रमुख ,हिंगणघाट निताताई धोबे, मनीष देवडे ,शंकर मोहमारे, श्रीधर कोटकर, मनोज मिसाळ, गजानन काटोले, भास्कर ठवरे, बंटी वाघमारे, मोहन तुमराम, माधुरी खडसे, संजय पिंपळकर गजानन काटोले, भूषण कापकर, प्रकाश घोडे, योगेश कामडी, सीमा गलांडे ,स्वाती पिंपळकर, लक्ष्मण बकाने, प्रियंका धोटे ,अंनता गलांडे, रुपेश काटकर, जय कुमार रोहनकार, दिनेश धोबे, आशिष जयस्वाल, भास्कर भिसे, नितीन वैद्य, शंकर झाडे, सुरेश चौधरी, सचिन मुळे, गौरव गाडेकर, हिरामण आवारी, बलराज डेकाटे, लता राजूरकर, गीता राजूरकर, उज्वला तांबुसकर, प्राजक्ता चापले, रेखा भालकर,उमेश धोबे, अनुश्री इजमुलवार, रेखा आदे, सुभाष तडस, सुजाताई इजमुलवार, दिपाली बावणे, शंकर भोमले, रजनी वेले, शकुंतला भुते, शालू मुंडे, चैताली बगीले, विमल कडू, गुंफा वाघमारे, उषा समर्थ, अर्चना कैकाडे, वासुदेव तुळसकर ,रेखा नेताम, शांताबाई आत्राम, संगीता बावणे, लता बावणे,रेखा बावणे, मंगला आत्राम ,सुनंदा बावणे, लक्ष्मी नैताम, अलका कुंमरे, लता कुमरे, नंदा खोबरे, बिंदिया दोहतरी, सविता हिवंज, कुसुम ठाकरे, शितल जंवजाळ, उमा गावड, नीता गावड, इंदू कुंभारे, संगीता अतकर, सविता भोयर, रूपा कुमरे, साधना धोबे, सुधा धोबे, कविता किरसान, गणेश आंबुलकर,अमोल त्रिपाठी एनडी कराळे, डी.बी.किटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…