श्री नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
8369205752
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे: – १२ एप्रिल, २०२२ रोजी फैजल मेमन नावाच्या इसमाच्या घरावर छापा टाकला आणि त्या ठिकाणाहून कोट्यावधीची रोकड सापडली होती. त्यातून छापेमारी करणाऱ्या पोलीस पथकाने सहा कोटीची रक्कम घेतल्याची तक्रार फैजल मेमन यांचे निकटवर्तीय शेख इब्राहीम पाशा यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे २५ एप्रिल रोजी लेखी स्वरुपात केली होती. या प्रकरणात ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचारी याना निलंबित करणायत आले होते. त्यांची चौकशी सुरु होती. या संयुक्तिक प्राथमिक चौकशीत निलंबित पोलीस अधिकारी हर्षद बबन काळे, पोलीस नाईक दिलीप नारायण किरपण, पोलीस नाईक अंकुश असाराम वैद्य आणि पोलीस शिपाई ललित पंडित महाजन यांचा सहभाग आढळला नसल्याचा अवहाल चौकशी समितीने दिला आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने एकाच खळबळ उडालेली होती. तर प्रकरण घडल्यानंतर मात्र तपास अक्रून रात्री पोलीस ठाण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सिसितीव्हीत दिसले. दरम्यान या घटनेत तब्बल दहा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करून प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आलेली होती. तब्बल एका वर्षानंतर या संयुक्तिक प्राथमिक चौकशीत एक अधिकारी आणि दोन पोलीस नाईक आणि एक पोलीस शिपाई यांचा या लुटीच्या प्रकरणात सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. तर अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी सुरु असलायची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
२५ एप्रिल २०२२ रोजी तक्रारदार शेख इब्राहीम पाशा यांच्या तक्रार अर्जानंतर सदरची चौकशी आणि कारवाई सुरु झाली. सदरची चौकशी ही तत्कालीन पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ यांच्या अखत्यारीत करण्यात आली. घटनेच्या नंतर एका वर्षाने या प्राथमिक चौकशीचा प्राथमिक अवहाल आला. या अवहालात देण्यात आलेले अंतिम आदेशात ठाणे पोलीस आयुक्त जय्जीत सिंग यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील नियम २५(२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये सदर प्राथमिक अवहाल देण्यात आला यात पोलीस उपनिरीक्षक हर्षद बबन काळे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत आहे. पोलीस नाईक दिलीप नारायण किरपण, पोलीस नाईक अंकुश असाराम वैद्य आणि पोलीस शिपाई ललित पंडित महाजन हे सार्वजन ठाणे शहर मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. या चारही जणांच्या सुरु असलेल्या संयुक्तिक प्राथमिक चौकशीत त्यांची कसुरी निष्पन्न होत नसल्याणे त्यांच्या विरोधात सुरु असलेली शिस्तभंग विषयक कार्यवाही या आदेशान्वये रद्द करण्यात येत असून त्यांचे कासुरीबाबात्चे प्रकरण हे नसती बंद करण्यात येत आहे. असे ठाणे पोलीस आयुक्त जय्जीत सिंग यांनी दिलेल्या अंतिम आदेशात नमूद केलेले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…