महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकरूनच सर्व घटकांचा विकास शक्य- देवराव निमकर सरपंच गटग्रामपंचायत भारोसा यांचे प्रतिपादन
निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा,दि, १४ एप्रिल:- तालुक्यातील गटग्रामपंचायत भारोसा येथे आज दिनांक १४एप्रिल २०२३ला गटग्रामपंचायत कार्यालय भारोसा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण भारतात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्ञान दिवस म्हणून साजरी केली जाते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विभूषित, जगातील सर्वात हुशार विद्वान म्हणून त्यांची ख्याती आहे. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार व स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री व मजूर मंत्री होते.त्यांनी सर्व घटकासाठी संविधानात समान हक्क व न्याय प्रदान केले. अश्या महान महामानवाच्या जयंतीचे अवचित्य साधून आज गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भारोसा इरई एकोडी तिन्ही अंगणवाडी सेविकाला मोबाईल वाटप करण्यात आले. या प्रसंगी गटग्रामपंचायत भारोसाचे सरपंच देवराव निमकर यांनी सांगितले की, बाबासाहेबांचे विचार सर्व भारतीयांच्या मनामनात खऱ्या अर्थाने रुजने आवश्यक आहे. तेवास देश प्रगतीकडे वाटचाल करेल.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उपसरपंच सौ. अर्चना भोजेकर, ग्रामसेविका सुनीता राजपूत तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका गावातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…