मालेगाव तालुक्यात दोन चिमुकल्या मुलीसह आईची विहिरीत उडी; दोन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण गावावर शोककळा.

सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जील्हातील मालेगाव तालुक्यातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. व्यसनी नवऱ्या कडून होणारा सततच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना विहिरीत फेकून देत स्वत:ही उडी घेतली. या घटनेत दोन्ही निष्पाप मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मालेगाव तालुक्यांतील रेगाव येथे शुक्रवार, 14 एप्रिल शुक्रवारी समोर आली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, रेगाव येथील बबन कांबळे यांची मोठी मुलगी आरतीचा विवाह काही वर्षांपूर्वी विकास गवई याच्याशी झाला. या दाम्पत्यास दोन मुली झाल्या. दरम्यान, विकासला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन जळले काही केल्या सुटले नाही. दारू पिऊन आल्यानंतर तो आरतीचा छळ करायचा. त्याला कंटाळून ती 8 दिवसांपूर्वी दोन्ही मुलींना घेऊन माहेरी, रेगाव येथे आली होती.

14 एप्रिल रोजी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू असताना दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास आरतीने दोन्ही मुलींना सोबत घेऊन गावाबाहेर जाताना दिलीप घुगे यांनी वडिल बबन कांबळे यांना सांगितले. त्यानंतर बराचवेळ शोधाशोध केली; मात्र आरती आणि दोन्ही मुलींचा पत्ता लागला नाही. यादरम्यान रेगाव शिवारातील समृद्धी महामार्गा जवळ सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामानजिक गजानन घुगे यांच्या विहिरीत आरतीने दोन्ही मुलींना विहिरीत फेकून देत स्वत:ही उडी घेतल्याचे समजले. तेथे काम करणाऱ्यांनी आरतीला जिवंत बाहेर काढले; मात्र दोन्ही मुलींचा मृतदेहच हाती आला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. याप्रकरणी बबन कांबळे यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी मुलींच्या मृत्यूस कारणीभूत आरती विकास गवई हिच्याविरुद्ध भादंविचे कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता वाघ करीत आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

14 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago