✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मक्त्याने केलेल्या शेतीचा मक्ता चुकविण्यासाठी पुतण्यासह बँकेत गेलेल्या शेतकऱ्याचे तब्बल दीड लाख रुपये चोरट्या महिलेने चोरुन नेले. ही घटना वर्धेच्या भामटीपूरा चौकात असलेल्या युनियन बँकेत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. ही चोरीची घटना बँकेच्या सिसिटीव्हीत कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप नानाजी हायगुने वय 48 वर्ष रा. गोजी हे मक्त्याने शेती करतात. शेतमालकाला 2 लाख रुपये मक्ता द्यायचा होता. त्यांना बचत गटाने अडीच लाख रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश वटविण्यासाठी ते पुतण्यासोबत युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेत अनेकजण उपस्थित होते. धनादेश वटविला असता 500 रुपयांच्या नोटांचे पाच बंडल बँकेतून मिळाले. ते सर्व पैसे दिलीप हायगुने यांनी पुतण्याच्या बॅगमध्ये ठेवले होते.
पुतण्याने ती बॅग खांद्यावर लटकवून ते दोघेही बँकेबाहेर निघाले. खाली उतरल्यावर त्यांना बॅगची चेन अर्धवट उघडी दिसली. त्यांनी बॅगमधील पैशांची पाहणी केली असता त्यात 500 रुपयांचे तीन बंडल म्हणजेच दीड लाख रुपये दिसून आले नाही. अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये बॅगची चेन उघडून नेल्याचे समजताच हायगुने याने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
बँक परिसरात लागून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरटी महिला कैद झाली. दिलीप हायगुने यांचा पुतण्या बँकेतील लोखंडी फाटकातून बाहेर निघत असताना त्याच्या मागून आलेल्या चोरट्या महिलेने चेन उघडून पैशांचे तीन बंडल काढून घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चोरटी महिला चेहरा झाकून असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.
अशोक सुर्यभान पाटील रा. भिमनगर मास्टर कॉलनी वर्धा यांच्या मालकीची गोजी येथील 14 एकर शेती दोन लाख रुपये मक्त्याने दिलीप हायगुने यांनी केली होती. मक्ता देण्यासाठी शेतमालक देखील त्यांच्यासोबत बँकेत गेला होता. बँकखाली शेतमालक प्रतिक्षेत होता. हायगुने यांचे पैसे चोरी गेल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन चंद्रपुर:- येथून एक खळबळजनक घटना…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 53…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘केल्याने होत आहे रे…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना…
अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व शासकिय वैद्यकीय…
प्रसिद्ध सिने कलावंत सयाजी शिंदे सह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होणार कार्यक्रम संपन्न. पल्लवी मेश्राम उपसंपादक…