राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
ठाणे:- ठाण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका महिला पोलिसाने पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आल्याने पोलिस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. अनिता भीमराव व्हावळ वय 34 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसांचे नाव आहे
ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये पोलिस नाईक या पदावर कार्यरत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या ओढणीच्या साहाय्याने पोलीस स्टेशन मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अनिता भीमराव वाव्हळ असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिसाचे नाव असून. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती वादातून वाव्हळ यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. वाव्हळ यांच्या पश्चात दोन मुली आणि पती असा परिवार आहे.
पोलिस नाईक पदावर कार्यरत अनिता वाव्हळ 2008 च्या बॅचच्या महिला पोलीस कर्मचारी होत्या. गेल्या तीन वर्षापासून श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होत्या. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाव्हळ यांनी ड्युटीवर असतानाच पोलीस ठाण्यातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. अनिता यांनी घरगुती वादातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत सखोल तपास पोलीस करत आहेत. तपासाअंतीच सत्य उघड होईल. अनिता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…