सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंदपुर:- राज्यात आणि चंद्रपूर जिल्हात शेतकरी व बेरोजगारचे प्रश्न गंभीर बनले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. या संकटात मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. नैसर्गिक व सुलतानी संकटाने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे अत्यंत गरजेचे आहे तसेच शेतकरी बरोबर राज्यात बेरोजगारांचे प्रश्न गंभीर बनले आहे महागडे शिक्षण घेऊन देखील युवकांना नौकरी नाही त्यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहे युवक युवतींना भविष्यात चिंता सतावत आहे हजोरो बेरोजगार युवक युवतीं पुढील भविष्याच्या काळजीने त्रस्त आहेत त्यामुळे संकटग्रस्त शेतकरी व निराश बेरोजगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्या साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मंदिप रोडे यांच्या नेतृत्वात शेतकरी व बेरोजगार सभा तथा मनसे जिल्हा कार्यकर्ता मेळावाचे आयोजन दि.१७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता तुकुम धांडे हॉस्पिटल येथे केले आहे.
आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या या शेतकरी व बेरोजगार सभा व मनसे जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याला मनसेचे नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत सभेला शेतकरी युवक युवतीने व मनसैनिकानी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे जिल्हा अध्यक्ष मंदीप रोडे यांनी केले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…