पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करा : बादल बेले
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे. स्वर्गीय बापूजी मामुलकर पाटील स्मृती प्रतिष्ठान राजुरा द्वारा संचालित सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल येथे प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य कृतिका सोनटक्के, प्राचार्य शबनम अहेमद अंसारी, उपप्राचार्य रफत परवीन अब्दुल माजीद शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्ष पूजन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बादल बेले यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्लास्टिक बंदी बाबत उपस्थित विध्यार्थीना माहिती दिली. पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करण्याचे विद्यार्थ्यांना यावेळी आवाहन करण्यात आले. 1जुलै 2022 पासून सिंगल यूज एकल वापर प्लास्टिक वर संपूर्ण देशात बंदी लावण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने आगस्ट 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2021 नुसार एकल वापर प्लास्टिक वस्तू प्रतिबंधित केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 अंतर्गत अनेक गोष्टींवर प्रतिबंध आहेत. त्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्लास्टिक बंदी वर अंमलबजावणी करून प्लास्टिकच्या कुठल्याही वस्तू वापरू नये. एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तू ऐवजी निसर्ग पूरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, बांबू, लाकडी वस्तू, सिरॅमिकच्या प्लेट, वाट्या अगदी चांगले पर्याय आहेत. सर्वांनी अशा निसर्ग पूरक वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केल्यास प्लास्टिक बंदीची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी आपल्याला करता येईल असे प्रतिपादन बादल बेले यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका पल्लवी आदे यांनी केले. आभार प्रदर्शन संगीता रागीट यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण गीत सादर केले. शाळेच्या जवळ असणाऱ्या छोट्याशा बगीचा मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षप्रतिज्ञा घेण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धेत क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या सर्व शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…