प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील विविध जनसमस्या सोडविण्यासाठी आज प्रहारच्या वतीने नप मुख्याधिकारी यांना रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे व अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवक सुरज कुबडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची तातडीने दखल घेत मुख्याधिकारी हर्षल गायकवाड तत्काळ प्रभागात येऊन या समस्याची पाहणी करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वॉर्ड या प्रभागात विविध समस्यां प्रचंड प्रमाणावर असून याबाबत वारंवार निवेदन देऊनही नप कडून कारवाई होत नसल्याने आज प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन यावर तोडगा न निघाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या प्रभागात पिण्याच्या पाण्याची प्रचंड समस्या आहे. कुबडे ले-आउट येथे मोकळ्या जागेत खड्डा बुजविण्याबाबत अनेकवार निवेदन देऊनही कारवाई झालेली नाही.लोंढेकर ले-आउट मध्ये असलेल्या विद्युत खांबावर लावण्याकरीता नवीन पथदिवे उपलब्ध करून देण्याची मागणी,गटार चे कनेक्शन त्वरित देण्याबाबत, पटवारी कॉलनी येथील पाण्याची टाकी असलेल्या मोकळ्या जागेवरील काडी कचरा काढून ती जागा समांतर करून देण्याबाबत व प्रभागातील सर्व मोकळ्या जागेला पक्के कुंपण करण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.निवेदन देतांना प्रहारचे रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे, अतुलभाऊ जाधव, अजयभाऊ लढी, रुग्णसेवक सुरज कुबडे, अजय ठाकरे, धीरज नन्दरे, किशोर देवढे, अमोल वाघमारे, अमोल रामगुंडे, सूरज तोडसाम, गुलाबराव वैद्य, रितेश नेवरा, अजय झलके, शरदराव गारघाटे, श्री. तोडसाम, वानखेडे, विठ्ठलराव कुबडे, देवाजी कुबडे, विक्रम सुरकार, किरण मडावी, वृषभ कोल्हे, दर्शन धानोरकर व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…