हिंगणघाट शहरातील महेश ज्ञानपीठ शाळेतील खळबळजनक खुलासा, शाळेच्या महिला प्राचार्या वर ४२० चा गुन्हा दाखल.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.१८ एप्रिल:- हिंगणघाट शहरातून एक खळबजनक माहिती समोर आली आहे. शहरातील महेश ज्ञानपीठ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या महिला प्राचार्य वैशाली पोळ यांचे वरती सुमारे २५ ते ३० लाख रुपयाचा अपहार केल्या प्रकरणी भादंवीच्या कलम ४२०, ४०६ प्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शालेय प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. महेश ज्ञानपीठ ही संस्था चालविणारे माहेश्वरी युवक मंडळ विश्वस्त मंडळातील उपाध्यक्ष रामकुमार जुगल किशोर डागा याचे तक्रारीवरून उपरोक्त महिला प्राचार्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळा हे विद्यार्थांना सुसंस्कृत बनविण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. पण या शाळेतून अशा प्रकारच्या माहिती समोर आल्याने या शाळेवर मोठ्ये प्रश्न निर्माण झाले. विध्यार्थी घडवणाऱ्या शाळेत असे प्रकार हे अशोभनीय आहे. यामुळे विद्यार्थी मनावर परिणाम होऊ शकतो.

सदर संस्थेद्वारा कार्यरत असलेल्या महेश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेला फी स्वरूपात जमा होणारी तसेच शासनाकडून आलेला निधी इत्यादी सर्व रक्कम संस्थेच्या विविध बँक खात्यात जमा केली जाते, प्राचार्य वैशाली पोळ या सर्व व्यवहारासाठी जबाबदार असून कार्यकारिणीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्यांनी स्वतःच्या मर्जीने व्यवहार करीत संस्थेच्या अंदाजे २५ ते ३० लाख रुपये निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांचे वरती लागलेला आहे.
दिनांक २१ सप्टेंबर २०१५ ते १७ एप्रिल २०२३ चे दरम्यान त्यांनी अशीच कुठलीही व्यवस्थापक कमिटीची परवानगी न घेता बँक खात्यातील रकमेचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

सदर प्रकरणी हिंगणघाट न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, न्यायालयाचे निर्देशानुसार संस्थेचे उपाध्यक्ष रामकुमार डागा रा. गोमाजी वार्ड, हिंगणघाट यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी काल दिनांक १७ एप्रिल रोजी कलम ४२०, ४०६ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणी ठाणेदार कैलास फुंडकर पुढील तपास करीत आहे.

याबाबत प्राचार्या वैशाली पोळ यांनी महाराष्ट्र संदेश न्युज ला दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील सर्व रोख रक्कमेचे बँक व्यवहार हे अध्यक्ष व माझे सहीने होत असतात, तसेच या सर्व व्यवहाराचे वेळोवेळी ऑडिटसुद्धा झाले आहे, माझेविरूद्ध न्यायालयाचे आदेशाने तक्रार करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे, परंतु यापूर्वी मला आपली बाजु मांडण्याची संधी मिळाली नाही. शालेय व्यवस्थापनाच्या दोन गटातील वादात मला विनाकारण गोवले जात आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

21 hours ago