चारचाकी व दुचाकी गाड्यांची गुन्हयात वापराकरीता चोरी करणा-या मालमत्तेच्या गुन्हयातील एका आरोपीस अटक

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (702079462)

खडकी पोलिस स्टेशन पुणे शह

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- यातील फिर्यादी या शिक्षिका असून त्यांनी दि. २३/०१/२०२३ रोजी त्याची काळ्या रंगाची पर्स सकाळी ०७/०० वा. ०७/३० वा. दरम्यान डॉ. राजेंद्र प्रसाद, ४३. जी. बोपोडी, पुणे येथे मैदानाच्या गेट वर अडकवली असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतच्ये आर्थिक फायद्या करीता लबाडीच्या उद्देशाने चोरी करून गेले बाबत खडकी पोस्टे गुन्हा रजि नं. ३५/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयांचा तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम व त्यांचा स्टाफ करीत असताना तपास पथक प्रमुख वैभव मगदुम यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की. रेकॉर्डवरील आरोपी नामे गणेश पोळके हा काही महिन्यांपूर्वी मालमतेविरुध्दच्या गुन्हयातून जामिनावर बाहेर आला असून त्याचे हालचाली या संशयास्पद असून तो पुन्हा मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करीत आहे व तो पाटील ईस्टेट पुलाखाली आहे अशी गुप्त बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे पाहण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम स्टाफसह पाटील ईस्टेट पुलाखाली आले असता बातमीदारांने सांगितले वर्णनाचा एक इसम संगमवाडी रोडकडे जाणारे दिशेने बाहेर थांबलेला दिसला त्यास स्टाफचे मदतीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश संजय पोळके, वय-२१ वर्षे, रा. पाटील ईस्टेट, वाकडेवाडी, पुणे असे सांगितले त्यास खडकी पो. स्टे येथे आणून चौकशी केली असता त्याने वरील गुन्हा केला असल्याचे कबुल केले त्यास दाखल गुन्हयात दि.११/०४/२०२३ रोजी अटक करण्यात आली असुन नमुद आरोपीस पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना त्याचेकडे तपास करता त्याचेकडुन वरील दाखल गुन्हयातील सोन्याच्या रिंगा व रोख रक्कम असा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच आरोपी गणेश पोळके यांचे कडे अधिक तपास करता त्यांचे कडुन उघडकिस आणलेले गुन्हे. १) चतु:श्रृंगी पो.स्टे. गुरनं. २१७/२०२३ मादवि ३७९ २) हडपसर पो.स्टे. गुरनं ५४२ / २०२३ भादवि ३७९ ३) दौड पो.स्टे. पुणे ग्रामीण गुरनं. २५७/२०२३ भा.द.वि. कलम ३७९, ४) यवत पो.स्टे. पुणे ग्रामीण गुरनं. २९६/२०२३ भा. द. वि. कलम ३७९, ५)हिंजवडी गो.स्टे. गुरनं १८७/२०२३ भा. द. वि. कलम ३७९ अन्वये दाखल गुन्हे उघडकिस आणलेले आहेत. यातील आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो एका ठिकाणाहून दुचाकी व चारचाकी गाडया चोरी करून तिचा वापर घरफोडी चोरी करण्याकरीता करत असत. तसेच सध्या नमुद आरोपी हा खडकी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३५/२०२३ भादंवि कलम ३७९ या गुन्ह्यामध्ये दिनांक १७/०४/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे.

सदरची कारवाई ही मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग श्रीमती आरती बनसोडे. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, श्री. विष्णु ताम्हाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) खडकी पोलीस ठाणे श्री मानसिंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री वैभव मगदुम, सहा पो फौज तानाजी कांबळे पोलीस नाईक उध्दव कलंदर, संदेश निकाळजे मुजीब शेख, पोलीस अमलदार जहाँगीर पठाण, सुधीर अहिवळे, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, शिवराज खेड, विजय गिरासे यांनी केली असुन गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री वैभव मगदुम हे करीत आहेत.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

14 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago