बल्लारपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रक्तदान शिबिरामध्ये 75 लोकांनी केले रक्तदान.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सववानिमित्त बल्लारपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, संवर्ग विकास अधिकारी किरण कुमार धनवडे, पोलिस निरीक्षक उमेश पाटील आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर रक्तदान शिबिरामध्ये डॉ. दीप्ती सूर्यवंशी, नायब तहसीलदार सतीश साळवे, निरीक्षण अधिकारी भरत तुबडे, कोषागार अधिकारी पंकज खनके, शैलेश धात्रक, सुनील चांदेवार, ॲड. गणेश जगताप, दीपक वडुळे, अजय गाडगे, चंदू आगलावे, गजानन उपरे, प्रमोद अडबाले, अजय नवकरकर, शंकर खरूले इत्यादी अधिकारी व कर्मचा-यांसह एकूण 75 जणांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमाचे संचालन दिपक वडुळे यांनी आभार प्रियंका खाडे यांनी मानले. यावेळी उपविभागीय अभियंता श्री. मुत्तलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम, राजू धांडे, कर्मचारी महसूल संघटनेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय राजुरा येथील कर्मचारी, आशा वर्कर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, रास्त भाव दुकानदार संघटना, अमन पसंद बहुउद्देशीय संस्था, सेव फॉरेस्ट सेव चंद्रपूर संस्था, रोटारॅक्ट क्लब, तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

9 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

40 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

5 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

7 hours ago