चोपडा शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 40 लाखांचा मुद्देमाल जप्त..!

विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी

चोपडा:- शहर पोलीसांची धडक कारवाई, 6 गावठी बनावटीचे पिस्टल व 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 40 लाखांचा मुद्देमाल जप्त.. चोपडा शहर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. 17 रोजी रात्री चोपडा – शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करतांना तब्बल चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याजवळून 6 गावठी बनावटीचे कट्टे, 30 जिवंत काडतूस, 4 मोबाईल फोन व फोर्ड एंडेवेअर कंपनीचे चार चाकी वाहन असा एकूण रु. 36,37000 किमंतीच्या मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 17/08/2022 रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास चोपडा ते शिरपुर रोडवर एस्सार पेट्रोलपंपाजवळ आरोपी नामे 1) गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे वय 25 वर्ष रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा 2) मोहसीन हनिफ मुजावर वय 30 वर्ष, रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा 3) रिजवान रज्जाक नदाफ वय 23 वर्ष रा. शिवाजी चौक, मलकापुर ता. कराड. जि. सातारा व 4) अक्षय दिलीप पाटील वय 28 वर्ष रा.45 रविवार पेठ, कराड जि.सातारा अशांनी अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करणारा आरोपी नामे सुरज विष्णु सांळुखे रा.कराड जि.सातारा याचे सांगण्यावरुन आरोपी नामे सागर सरदार पुर्ण नांव माहिती नाही (शिखलकर) रा. पारउमर्टी ता.वरला जि.बडवानी याच्या जवळून 6 गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच 30 पिवळया धातुचे जिवंत काडतुस हे विनापरवाना व बेकायदेशीर रित्या स्वताच्या कब्ज्यात बाळगून कोणास तरी विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने चारही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्याचे ताब्यातील 1,20,000 रुपये किंमतीचे 6 गावठी कट्टे, 30,000 रुपये किंमतीचे 30 जिंवत काडतूस, 87000/- रुपये किमंतीचे 4 मोबाईल फोन व 35,00,000/- रुपये किमंतीची फोर्ड एन्डेव्हर कपंनीचे वाहन क्रंमाक MH 50 L 8181 या चार चाकी वाहनासह 37,37000/- किमंतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व 6 ही आरोपी हे संगनमताने गुन्हा करतांना मिळुन आल्याने चोपडा शहर पोस्टे. भाग 5 गुरनं. 336/2022 भादंवि कलम 34 प्रमाणे आर्म अॕक्ट 3/25, 7/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक चोपडा विभाग कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोहेकाँ. दिपक विसावे, पोना. संतोष पारधी, पोना. संदिप भोई, पोकाँ. शुभम पाटील, पोकाँ. प्रमोद पवार व पोकाँ. प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे हे करीत आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

3 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

3 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

4 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

4 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

4 hours ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

4 hours ago