आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी

निफाड :- एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही म्हणून याचा राग येऊन नैताळे येथील ऋषिकेश जालिंदर सुरासे या इयत्ता 6 वी मध्ये शिकणार्‍या 12 वर्षे वयाच्या मुलाने घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या बाबत निफाड पोलिसांकडून कळालेली माहिती अशी की, नैताळे येथील आदिवासी वस्तीमध्ये जालिंदर सुरासे व पत्नी भारती सुरासे आपल्या दोन मुलांसमावेत राहतात. ते मोलमजुरी करून कुटुंबाचे पालन पोषण करतात त्यांचा एक मुलगा इयत्ता सहावी तर दुसरा इयत्ता तिसरीत प्राथमिक विद्यामंदिर नैताळे या नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. त्यातील इयत्ता 6 वी मध्ये शिकत असलेला 12 वर्ष वयाच्या ऋषिकेशने आई भारती यांच्याकडे गेम खेळण्यासाठी मोबाइल मागितला. भारती यांनी अभ्यास कर असे म्हणत त्यानी ऋषिकेशला मोबाइल देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या बाजारात गेल्या. परतल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना ऋषिकेश ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती कुटुंबाने निफाड पोलिसांना दिली.पोलिसानी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. निफाड येथे विच्छेदनानंतर ऋषिकेश चा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देशमुख करीत आहेत.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

2 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

4 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago