सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून एक हत्याची खळबळजनक घटना समोर आली होती. त्यात महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ती हत्या एका उच्च शिक्षित तरुणीने केल्याची माहिती समोर आली आहे.
बल्लारपूर येथील न्यू कॉलनी रोड, महाराणा प्रताप वॉर्डाजवळील माता मंदिर परिसरात शुक्रवार, 21 एप्रिलच्या मध्यरात्री एक हत्येची घटना समोर आली होती. त्यात नात्यातील व्यक्ती दारू प्राशन करून आपल्या आजी, आईला विनाकारण शिवीगाळ करतो. नेहमी दारूच्या नशेत जीवे मारण्याची धमकी देतो. या नेहमीच्या प्रकाराने त्रस्त होऊन ती व्यक्ती दारूच्या नशेत झोपून असताना त्याचा गळा आवळून एका उच्च शिक्षित तरूणीने हत्या केली. त्याला गतप्राण करण्यासाठी धारदार ब्लेडने त्याचा गळादेखील चिरला. याप्रकरणी पोलिसांनी त्या उच्च शिक्षित तरुणीला अटक केली आहे. मृतकाचे नाव विशाल दासरवार असे आहे. आरोपी तरुणीचा नात्यातील मृतक मावसा असल्याची माहिती आहे.
बल्लारपूर येथील शामराव कोडुरवार यांचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला. त्यांना तीन मुली होत्या. त्यांची पत्नी पुष्पा कोडूरवार यांच्या घरात सर्व जण मिळून राहत होते. यातच दुसर्या क्रमांकाचा जावई विशाल दासरवार हा सासू पुष्पा कोडूरवारसोबत नेहमी घराच्या हिश्यावरून भांडण उकरून काढत होता. दारू प्राशन करून अश्लिल शिवीगाळ करीत होता. आपल्या उच्च शिक्षित नातीवर आजी पुष्पाचा अधिक जीव होता. त्यामुळे घर कधीतरी तिच्या नावे करणार म्हणून विशालचा संशय बळावला होता. या कारणावरून सासू पुष्पा व आरोपीची आई, वडील यांच्या सोबत विशाल नेहमी भांडण उकरून काढत होता. दारूच्या नशेत जीवे मारण्याची धमकी देत होता.
मृतक विशाल यांचा सततच्या त्रासामुळे घरातील सारेच त्रस्त होते. विशाल शुक्रवारी घरी दारू प्राशन करून आला. पुन्हा त्याने नेहमीचा तगादा लावला. त्याचा नेहमीचा जाच असह्यय झाल्याने विशाल गाड झोपेत असताना त्याचे हातपाय बांधून व गळा आवळून त्याची घरीच हत्या करण्यात आली केली. अनावर झालेला राग शांत करण्यासाठी त्याच्या गळ्यावर ब्लेडने वारदेखील केला. बल्लारपूर पोलिसांनी या प्रकरणी तरुणीला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्यावर भादंवीच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास बल्लारपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे व त्यांचे पथक करीत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…