मी अतिशय दुःखद मनाने प्रायश्चित घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. का ? कशासाठी ? कारण काय ?
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील माय – बहिणींना होत असलेल्या त्रास बद्दल 24 एप्रिलला रुग्णसेवक आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते गजू कुबडे यांच्या वतीने यांचे माझे प्रायश्चित आंदोलन करणार आहे.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युज बरोबर बोलताना रूग्णसेवक गजु कुबळे म्हणाले की, मी या शहराचा एक सामान्य नागरिक. माझ्या वाड-वडीलांच्या अनेक पिढ्या जीवनदायिनी वणा नदीच्या अमृतमयी पाण्यावर जगल्या, जगत आहेत. या मातीचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. व ते फेडण्याचा छोटासा प्रयत्न मी रुग्णसेवेच्या माध्यमातून करीत आहे. मागील 20 वर्षांपासून मी हे कार्य करीत असतांना माझ्या लक्षात आले की या एक लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या माझ्या गावात रुग्णसोयी अजिबात नाहीत. गावाबाहेरून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उपजिल्हा रुग्णालयाची एक मोठ्ठी इमारत या गावाची शोभा वाढवीत आहे. या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णासाठी कोणत्या सोयी सवलती आहेत याचा विचार करीत असतांना माझ्या लक्ष्यात असे आले की, रुग्णालयात सोनोग्राफीची मशीन आहे परंतु ती केवळ शोभेची वस्तू म्हणून उभी आहे. मागील दोन वर्षांपासून ती बंदच आहे. या मुळे या गावातील गर्भवती महिलां तसेच पोटाचे आजार असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी एकतर खासगी रुग्णालयात किंवा सेवाग्राम, सावंगी किंवा नागपूर येथे जाऊन उपचार करावा लागतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीचा वेळ,पैसा वाया जाऊन शारीरिक मानसिक त्रास होतो तो वेगळाच.!
पुढे बोलताना गजु कुबळे म्हणाले की, या संपन्न असलेल्या शहरातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांच्या आरोग्याची होणारी हेळसांड मन विदीर्ण करणारी आहे. या आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणे साठी मी वेळोवेळी अनेकदा सक्षम अधिकाऱ्यांना निवेदन देऊन छोटी मोठी आंदोलनेही केली आहे. उपजिल्हा रुग्णालया समोर तीन दिवस अन्नत्याग आंदोलनही केले. परंतु त्याचा कोणताही परिणाम या सुस्तावलेल्या यंत्रणेवर होत नाही. झाला नाही. सामान्य नागरिकांना त्यांचा घटनादत्त अधिकार मिळत नाही ही शोकांतिका आहे. ह्या साऱ्या परिस्थितीचा विचार करून मी माझ्या मनाशी एक विचार केला की या गावचा एक जबाबदार नागरीक म्हणून मीही आपल्या कर्तव्याला चुकलो का ? मी एक सामान्य कुवतीचा तरुण आहे. मी नगरसेवक / प स किंवा जिप चा सदस्य नाही. व आमदार-खासदार होणे दूरच राहिले. ज्यांची जी जबाबदारी आहे ते या कर्तव्यापासून दूर का आहेत हे माझ्या आकलनापल्याड आहे.
तरीही एक नागरिक म्हणून व या गावचा एक सुपुत्र म्हणून ही आरोग्याची कुचकामी व्यवस्था माझ्यासाठी वेदनादायी असल्याने या व्यवस्थेचा एक भाग म्हणून मी या प्रकारचा निषेध म्हणून एक दिवसाचे प्रायश्चित्त आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोमवार, दि.२४ एप्रिलला मी वैशाख वणव्यात भर दुपारी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोरच्या मोकळ्या मैदानात दिवसभर अनवाणी पायाने उभा राहून प्रायश्चित्त आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या प्रत्येक उपक्रमाला आपला पाठींबा असतोच तसा यालाही आपले आशीर्वाद द्याल ही विंनती.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…