संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन नागपुर:- येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.
नागपूर शहरातील मेडिकल रुग्णालयातील अतिदक्षता विभाग असलेल्या वार्ड क्रमांक 52 मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी खासगी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. या वार्ड क्रमांक ५२ मध्ये आपत्कालीन स्थितीत डायलेसिस आणि अत्यवस्थ रुग्णांना दाखल केले जाते. वार्डाच्या बाहेर नातेवाईक बसले असतात. शुक्रवारी दुपारी येथे एक अत्यवस्थ रुग्णाला दाखल केले गेले. त्याच्यासोबत सुमारे 15 ते 20 नातेवाईक आले.
नातेवाईकांनी रुग्णाला बघण्याच्या नावावर वार्डात शिरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने त्यांना रोखले. एका नातेवाईकाने सुरक्षा रक्षकावर हात उगारला. यामुळे तणाव निर्माण झाला. या विषयावर अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना संयम पाळण्याचे आवाहन केले.
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर पोलीस स्टेशन…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज मकरसंक्रांत असल्यामुळे नागपूरात सर्वत्र…
*(वनश्री महाविद्यालय कोरची येथे लेखक - वाचक संवाद कार्यक्रमाचे आयोजन )* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -…
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर…
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर…