मानवेल शेळके नाशिक प्रतिनिधी
नाशिक:- रोज फसवणुकीच्या बातम्या समोर येत असतात. अशीच एक बातमी नाशिक मधून समोर आली आहे. ‘दीड लाख रुपये द्या, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो’, असे म्हणून नाशिकमध्ये अनेक तरुणाची फसवणूक झाली आहे.
देशात अनेक स्थिकाणी विद्यार्थ्यांन कडून पैसे घेऊन बोगस प्रमाणपत्र देऊन लाखो रुपये उकळण्यात आल्याच्या अनेक घटना याअगोदर समोर आल्या आहे. नाशिकमध्ये देखील एका विद्यार्थ्यांची दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो’, असे म्हणून प्रमाणपत्र देण्यासंदर्भात फसवणूक करण्यात आली आहे. संबंधित युवकांकडून सव्वा लाख रुपये उकळण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हि घटना घडली आहे. फार्मसीची डिग्री देण्याच्या बहाण्याने कचेरी रोड येथील युवकाची फसवणूक करण्यात आली आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जाकीर अब्दुल रहमान शहा या विद्यार्थ्यांची पाच संशयितांनी संगनमत करून तब्बल एक लाख २५ हजारांची फसवणूक केल्याने शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर शहाला फार्मसीमध्ये शिक्षण घ्यायचे होते. या दरम्यान त्याने मित्रांच्या माध्यमातून प्रमाणपत्र काढून देणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आला.
दरम्यान संबंधित नागरिकांशी संपर्क साधून प्रमाणपत्रा विषयी बोलणे झाल्यानंतर व्यवहार करण्यात आला. यावेळी सव्वा लाख रुपयांवर डी फार्मसीची डिग्री देण्याचे कबूल करण्यात आले. त्यानुसार बंगलोर येथील कॉलेजला ऍडमिशन घेतली मात्र प्रवेश फी भरली नाही. या दरम्यान बरेच दिवस झाल्यानंतर डिग्री न मिळाल्यामुळे तसेच मूळ कागदपत्र आणि रक्कमही पार्ट न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शहाच्या लक्षात आले. त्यांनतर त्याने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. शहा यांच्या तक्रारीनुसार पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात जाकीर रफिक कुरेशी, गुफरान खान मोहम्मद अली, पाशा मुर्शिद अली, सविता मनोज तिवारी आणि मनोज तिवारी अशी संशयितांची नावे असून पहिल्या तिघांनी शहा यास तुम्हाला घरसबसल्या फार्मसीची डिग्री देतो, असे सांगून सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. जाकीर शहा यांनी येवला पोलिसांत तक्रार दाखल करीत शहा यांच्या तक्रारीनुसार पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…