पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. संदीप कर्णिक सह पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतुन पुणेकरांच्या सायबर तक्रारीसंदर्भात योग्य ती दखल घेण्याकरीता प्रत्येक पोलीस ठाणेस सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर कक्षाचे सपोनि बाजीराव नाईक, पोलीस अमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबइलचा डेटा तयार करुन त्याबाबत तांत्रिक तपास करुन त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पं.बंगाल, बिहार, पंजाब य महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्यांशी तसेच संबधीत पोलीस ठाणेस पोलीस अंमलदार आदेश चलवादी यांचेकडे असलेली बहुभाषीक कौशल्याचा (कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी व मराठी ) वापर करून विविध भाषामध्ये संवाद साधून हरवलेले एकुण ९.५० लाख रु. कि.चे ५१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलीसांचे वेबसाईटला तसेच शासनाचे Central Equipment Identity Register( CEIR ) या पोर्टलवर नोंद करावी असे आवाहन पुणे पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा.राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. सदीपसिंग गिल्ल, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ व मा. गजानन टोम्पे सपआ विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री. अरविंद माने, पोनि (गुन्हे) श्री. विक्रम गौड़, सपोनि बाजीराव नाईक, पो. इ रुपेश वाघमारे, गणपत बालकोळी, पोलीस अंमलदार आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, अर्जुन कुडाळकर, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…