नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
8369205752
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घोडबंदर रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या “समर वंडरलँड” या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असताना शिवसेना विभाग प्रमुख रवी घरत यांनी घोडबंदर रोडवरील होणाऱ्या वाहतूक समस्या संदर्भात चर्चा केली. यावेळी मुख्यतः वाघबीळ येथे वनविभागाच्या जागेवर असलेल्या भिंतीमुळे तसेच कॉसमॉस ज्वेल्स येथे वाहतूक कोंडी होत होती.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड वर मेट्रोचे काम सुरू असून या कामामुळे या भागात नागरिकांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये बऱ्याचदा खाजगी वाहनासह फायर ब्रिगेडच्या गाड्या व ऍम्ब्युलन्सही अडकल्या जात असतात. आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास अथवा रूग्णवाहिकेमध्ये अत्यंस्थ रूग्ण असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. घोडबंदर रोडहून इच्छित स्थळी जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याने या रोडवरील वाहतुककोंडीमुळे कमीत-कमी अंतरासाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागत आहे.
या भागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी या नात्याने मा. नगरसेवक पूर्वेश प्रताप सरनाईक व रवि घरत यांच्याकडे या वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली होती. मुख्यतः वाघबीळ येथे वनविभागाच्या जागेवर असलेल्या भिंतीमुळे तसेच कॉसमॉस ज्वेल्स येथे असलेल्या भिंतीमुळे वाहतूक कोंडी होत होती. मुख्यमंत्री महोदयांनी घोडबंदर वासियांच्या या मागणीकडे लक्ष देऊन महानगर पालिकेच्या माध्यमातून तातडीने या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ओवळा माजिवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करून या गोष्टीचा पाठपुरावा केला होता.
पूर्वेश सरनाईक व रवि घरत यांनी केलेल्या सूचना मान्य करून आयुक्त अभिजित बांगर यांनी आजपासूनच संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याबद्दल रवि घरत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आयुक्त अभिजित बांगर यांचे मनापासून आभार मानले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…