✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुकात आरोग्याचा विचार केला तर माघास आहे. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून मागील अनेक दिवसापासून शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समिती आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज दि. 25 एप्रिलला हिंगणघाट बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
हिंगणघाट शहरात शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे म्हणून तालुक्यातील नागरिकांनी सकाळ ९:३० वाजता पासून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हिंगणघाट येथे उत्स्फुर्तपणे गोळा होऊन आंदोलन रॅलीत सहभागी होऊन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली व शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समिती आणि सर्व व्यापारी संघटना त्याच प्रमाणे सर्व शाळा महाविद्यालयचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, गावातील सर्व सामान्य नागरिक, महिला, व दुकानदार आणि सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित राहून शासकीय मेडिकल कॉलेज या आंदोलनात सहभागी राहुन हिंगणघाट व्यवसाय प्रतिठान व शाळा, कॉलेज, मेडिकल चोटी टपरी दुकाने बंद ठेऊन शहरातील नागरिक याआंदोलनात उपस्थित राहून शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात बनण्यात यावा यासाठी हिंगणघाट शहर बंद आंदोलन केले.
परिसरातील सर्व नागरिकांनी हिंगणघाट येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व्हावे या करिता रॅली काढून शहर बंद चे आंदोलन करण्यात आले आहे. यात विविध सामाजिक व व्यवसायीक संस्था व संघटना, सर्व राजकिय पक्षाचे नेते मंडळी तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, वकिल, डॉक्टर, शेतकरी व शेतमजुर, संघटित व असंघटित कामगार व सर्व नागरिक सर्वांनी सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हिंगणघाट येथे उत्स्फुर्तपणे गोळा होऊन आंदोलनात सहभागी होऊन आपली उपस्थित दर्शवली.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…