सीतापुर मध्ये अराजक तत्वाने तोडला भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. सर्विकडे संताप.

प्रशांत जगताप, महाराष्ट्र संदेश न्युज
उत्तर प्रदेश, दि. 18ऑगस्ट:-
येथील सीतापुर जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सितापुर जील्हातील हरगांव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रिखीपुरवा गावात शुक्रवार सकाळच्या सुमारास जातीवादी मानसिकता असलेल्या अराजक तत्वाने मुख्य चौकात लाऊन असलेली भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करून तो तोडला. त्यामुळे सर्वीकडे एकच संतापाची लाट उसळली आहे.

रिखीपुरवा गावातील स्थानीक नागरिकांनी जेव्हा शुक्रवारला सकाळच्या सुमारास जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा क्षतिग्रस्त बघितला तर याची माहिती स्थानिक पुलिस स्टेशनला दिली. बघता बघता लोकांची गर्जी घटनास्थळी जमा झाली.

प्राप्त माहीतीनुसार, सीतापुर जिल्हातील हरगांव पोलिस स्टेशन हद्दीत शुक्रवारला सकाळी अराजकतत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत ती तोडली. पुलिसानी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या मामल्यात प्राथमिक (FIR) दर्ज केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

घटनेची गांभीर्य बघून पोलिसांचा चमू बरोबर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानीक नागरिकांनी आपला रोष व्यक्त करत आंदोलनाची धमकी दिली. त्यामुळे पोलसांनी या घटनेतील शामील आरोपीवर लवकरात लवकर कारवाही करून त्यांना बेळ्या ठोकण्याचे आश्वासन दिले.

अपर पुलिस अधीक्षक राजीव दीक्षित यांनी सांगितले, ‘अराजकतत्वाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करून पुतळा तोडून आम्ही या घटनेत अज्ञात लोकांन विरोधात मामला दर्ज केला आहे व तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपिना लवकऱ्यात लवकर अटक करण्यात येणार. स्थानीक प्रशासनाने क्षतिग्रस्त पुतळा बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

22 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

24 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago