समाजकल्याण व बार्टी तर्फे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा या विषयावर कार्यशाळा संपन्न.

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे, दि. २६ एप्रिल:- सहा. आयुक्त समाजकल्याण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, सामाजिक न्याय पर्व अंतर्गत सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी येथे सफाई कर्मचारी कायदा, ज्येष्ठ नागरिक कायदा तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

आयोजित सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीमती संगीता डावखर (सहा.आयुक्त समाजकल्याण, पुणे) यांनी केले, श्री.पाटील( सरकारी अभियोक्ता) यांनी अनु. जाती अनु.जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. सुनील कांबळे यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणारे कायदे तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती. शितल बंडगर( प्रकल्प अधिकारी बार्टी) यांनी Prohibition of employment as manual scavenger and rehabilitation Act २०१३ यावर मार्गदर्शन केले. श्रीमती रेखा आनंद (राष्ट्रीय हेल्पलाईन) यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्या साठी असणाऱ्या हेल्पलाईन बद्दल मार्गदर्शन केले. श्रीमती सुरभी पवार (पोलीस निरीक्षक, नाहसं) यांनी कायदा व सामान्य नागरिक म्हणून आपली समाजाप्रती जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेस प्रमुख अतिथी श्री. गजानन टोणपे (पोलीस उपायुक्त विश्रामबाग), श्रीमती. तावरे (उप विभागीय पोलिस अधिकारी, नाहसं) श्री.यशवंत गवारी उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रचे सूत्रसंचालन श्री. गौरव माने तर दुसऱ्या सत्राचे सूत्र संचालन श्रीमती शितल बंडगर यांनी केले. सदर कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी तसेच पुणे जिल्हा समता दूत उपस्थित होते. सामाजिक न्याय पर्व मधील कार्यक्रम हे श्री सुमंत भांगे (सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहा.विभाग), श्री.सुनील वारे (महासंचालक बार्टी), श्रीमती संगीता डावखर सहा.आयुक्त समाजकल्याण पुणे), श्री. सत्येंद्रनाथ चव्हाण (विभागप्रमुख विस्तार व सेवा बार्टी ) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.लव्हे( स. क. नि.) शितल बंडगर ( प्रकल्प अधिकारी) पुणे जिल्हा व टीम पुणे जिल्हा समता दुत यांनी परिश्रम घेतले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोग फंडातून खूप वर्ष प्रलंबित असलेले काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हातकणंगले:- तालुक्यातील पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायत च्या…

7 mins ago

गोंडपिपरी येथे आमदार सुभाष धोटे यांचा कार्यकर्ता स्नेह मिलन मेळावा संपन्न, कार्यकर्ता मध्ये उत्साहाचे वातावरण.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी दि.19:- लक्ष्मणराव जगगन्नाथ कुंदोजवर…

17 mins ago

एकात्मिक बालविकास प्रकल्प गोंडपिपरी बीट धाबा तर्फे पोषण अभियान माह जनजागृती.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- 1 सप्टेंबर ते 30…

27 mins ago

पुण्यात अनैतिक संबंधातून पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलींसमोरच केली पतीची निर्घृण हत्या.

वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कर्वेनगर येथून एक खळबळजनक…

34 mins ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

3 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

23 hours ago