चांदणी चौक पुणे महामार्गावर कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी. हिंजवडी पोलिसांनी केली जेरबंद ०६ गुन्हे उघड.

डॅनियल ॲन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- चांदणी चौक ते पुणे या महामार्गावर पादचाऱ्यांना कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून जबरी चोरीचे ०६ गुन्हे उघड केले आहे. १) रामदास बबन कचरे वय २३ वर्षे रा. सोनमलोन, ता.महाड, जि. रायगड, सध्या रा. डोनजे गाव ता. हवेली जिल्हा पुणे आणि ०२ विधी संघर्षित बालक असे ताब्यात घेतलेले यांची नावे आहेत. याप्रकरणी यश नागेश नळगे वय ३० वर्षे, व्यवसाय गवंडीकाम, रा. के ऑफ शशिकांत सुतार चाळ, पोस्ट ऑफिस समोर, कोथरूड, पुणे यांनी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश नळगे हे शनिवार (ता १) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकच्या अलीकडे असलेल्या काचेच्या बिल्डिंगशेजारी सर्विस रोड, बावधन पुणे येथे मोबाईल फोनवर बोलत असताना अज्ञात आरोपी यांनी फिर्यादी यश नळगे यांचे खिशात हात घालून पैशाचे पाकिट काढून मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रतिकार केला असता त्या अज्ञात आरोपींनी फिर्यादी यश नळगे यांच्या हातावर त्याच्याकडील लोखंडी कोयता मारून जखमी केले तसेच फिर्यादी यश नळगे यांच्याकडील हिरो होंडा कंपनीची स्पेंलेंडर दुचाकी समंती शिवाय चोरुन येऊन पळून गेले. हा गुन्हा हिंजवडी पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्या नंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या.

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सतत दहा दिवस चांदणी चौक ते बावधन, बावधन ते लवासा, पौड, खडकवासला आदी परिसरातील ६५ सीसीटीव्ही फुटेज तपासले, खडकवासाला भागातील पोलीस रेकॉर्डवरील रामदास बबन कचरे याच्याशी मिळते जुळते वर्णांचे फुटेज मधील व्यक्ती असल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीयता महिती मिळवली असता सदरचा गुन्हा हा रामदास कचरे आणि त्याच्या ०२ साथीदाराने मिळून केला असल्याची माहिती पोलिसाकडे प्राप्त झाली. सिहंगडपायथा, लवासा परिसर मुठा गाव ताम्हिणीघाट या परिसरात पोलीसांनी वेषांतर करुन सापळा रचला असता पोलिसाची चाहुल लागताच आरोपी रामदास कचरे व त्याचे दोन साथीदार पळून जात होते. दरम्यान सहायक पोलिस फौजदार बंडु मारणे याना गोपनिय महिती मिळाली कि आरोपी रामदास कचरे हा माण येथिल बापुजी बुवा मंदिर येथे त्याच्या दोन साथीदारासह बसलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषागाने पोलिसांनी मोठया शितफीने आरोपी व त्याच्या साथीदार पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले. सदर गुन्हा मिळून केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

आरोपी रामदास कचरे यांनी कोयत्याचा धाक दाखवून हिंजवडी पोलीस स्टेशन ०३ पौड पोलीस स्टेशन ०२ हवेली पोलीस स्टेशन ०१ असे एकूण ०६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
याशिवाय त्याच्याकडून ०१लाख १८हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे सहायक आयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त डॉ.काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)सोन्याबापु देशमुख, तपास पथक प्रमुख पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलिस अमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, नितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सुभाष गुरव, नरेश बलसाने, सागर पंडित यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

38 mins ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

20 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

23 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

23 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago