जनता विद्यालय ताडाळी येथे सत्कार तथा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ताडाळी:- चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता विद्यालय ताडाळी येथे शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री शेषराव यादवराव ठाकरे यांची मुख्याध्यापक म्हणून जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोठारी येथे बदली झाल्यामुळे त्यांना शाळेच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात देण्यात आला. या निरोप तथा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री बी.जी जीवतोडे प्रमुख पाहुणे म्हणून ताडाळी गावचे उपसरपंच निखिलेश चामरे, जनता कॉन्व्हेंटच्या प्राचार्या निशा पिदूरकर उपस्थित होत्या.

यामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांनी ठाकरे सरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तसेच त्यांनी 29 वर्षात जनता विद्यालय ताडाळी येथे केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच पुढील जबाबदारी साठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती विना भगत, कु.अनिता बुच्चे, श्रीमती आशा पिदुरकर, कु. सुधा उमरे, उपस्थित होत्या, त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र धांडे यांनी केले तर प्रास्ताविक अरुण जोगी, आणि आभार प्रणवकुमार उलमाले यांनी केले. याप्रसंगी जनता कॉन्व्हेंटच्या शिक्षिका प्रतिभा निखाडे, सुप्रिया घोटकर, प्रांजली वासेकर, शाळेतील जेष्ठ लिपिक विजय गोहोकार,क. लिपिक संदिप बोबडे, शिपाई विठ्ठल जुनघरे, कमलबाई वाघमारे तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

18 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

18 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

21 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

21 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago