आलापल्ली वनविभागात गुरे प्रतिबंधक खोदकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार, चौकशीच्या नावाखाली लेटलतीफी.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- आलापल्ली वनविभागाअंतर्गत येत चर असलेल्या, आलापल्ली वनपरिक्षेत्रा मध्ये गुरे प्रतिबंधक चर (TMC) खोदकामात मोठया प्रमाणात आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार, बनावट मजूर, बनावट कागदपत्राचा वापर करून वरिष्ठाची तथा शासनाची दिशाभूल झालेली असल्यामुळे त्याची सविस्तर चौकशी करून जबाबदार कर्मचारी तथा अधिकारी वर्गाना निलंबित करून त्यांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करणे करिता, दि. 26 डिसेंबर 2022 ला वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली वनवृत्त, गडचिरोली तथा वरिष्ठाकडे तक्रार केलेली होती. तो तक्रारअर्ज त्यांनी उपवनसंरक्षक, आलापल्ली वनविभाग, आलापल्ली यांच्याकडे अग्रेषित करून तक्रारीत नमूद बाबीच्या अनुषंगाने नियमानुसार चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा वास्तूतिथी दर्शक अहवाल आपल्या अभिप्रायासह तात्काळ त्यांचे कार्यालयास सादर करण्याचे त्यांना आदेशित केलेले होते.

मिळालेल्या आदेशाच्या अनुषगाने उपवनसंरक्षक, आलापल्ली यांनी एका चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली होती. त्याला आज जवळ पास 4 महिन्याचा कालावधी झालेला असतांनाही सदर चौकशी अहवाल हा उपवनसंरक्षक, आलापल्ली वनविभाग, आलापल्ली, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली वनवृत्त, गडचिरोली, पोलीस अधीक्षक, गडचिरोली तथा तक्रारकर्ता म्हणून मला आजही अप्राप्त आहे.करिता सदर चौकशी मिळणे करिता मला शेवठी माहितीच्या अधिकाराचा वापर करावा लागला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आपल्या अधिनस्थ कनिष्ठ अधिकारी तथा कर्मचाऱ्यावरती नियंत्रण नाही, त्यामुळेच तर वनसंरक्षक तथा उपवनरक्षक यांचे आदेशाला त्यांचेच अधिकारी तथा कर्मचारी जुमानत नाहीत, त्यांचे आदेशाचे पालन करित नाहीत. ही फारच गंभीर स्वरूपाची बाब असून ते शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र आहेत. चौकशी अधिकारी हे रमत गंमत, हसत खेळत, चाल ढक्कल करित, फुल टाईमपास करित अहवाल सादर करतीलच, तो चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो नक्की आपल्याला दाखवू.

प्रत्यक्ष कामे JCB ने करण्यात आलीत. परंतु ते मजुरा मार्फत करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आलेली आहेत. त्या बोगस मजुरांची नावे तथा JCB ची माहिती आपण लवकरच जाहीर करणार आहोत. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

13 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

14 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

16 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

17 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

21 hours ago