जीओ फायबरचे कनेक्शन देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणुक करणाऱ्यास हरियाणा येथून अटक

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- जीओ फायबरचे कनेक्शन देण्याच्या नावाखाली फिर्यादी यांना व्हॉटसअॅप द्वारे Jiofiber.APK फाईल पाठवून फिर्यादीचे नेटबँकिंग युजरआयडीचा अॅक्सेस मिळवुन फिर्यादी यांची एकुण ५,००,६९८/- रुपयाची आर्थिक फसवणुक करणाऱ्या इसमास हरियाणा राज्यातून अटक करण्यास सायबर तपास पथक दत्तवाडी पोलीस स्टेशन यांना यश आल आहे.

दत्तवाडी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या एका ६० वर्षीय व्यक्तीस जीओ फायबरचे कनेक्शन हे सवलतीच्या दरामध्ये देतो असे आमिष दाखवुन त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या नावाखाली फिर्यादीची नेटबँकिंग अकाऊंट माहिती मिळविणे कामी Jiofiber. APK फाईल व्हॉटसअॅप वर पाठवून ती डाऊन लोड करावयास सांगितली सदरचे अप्लीकेशन डाऊनलोड झाल्यानंतर त्या अॅप्लीकेशन द्वारे फिर्यादी यांच्या नेटबँकींग अकाऊंच्या युजर आयडी व पासवर्डचा गैरवापर करून नेटबँकींगद्वारे फिर्यादीयांचे अकाऊंट मधुन दि. ०९/०४/२०२३ रोजी पहाटे एकुण ५,००,६९८/-रुपये अज्ञात इसमाने काढुन घेतले होते. सदर बाबत दि.०९/०४/२०२३ रोजी फिर्यादी यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज केला होता त्या अनुशंगाने दि २०/०४ / २०२३ रोजी आर्थिक फसवणुकी बाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सायबर तपास पथकाने आरोपीचे मोबाईल क्रमांक तसेच बेनिफिशरी बँक अकाऊंटची संबधित कंपनी कडून माहिती प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे फसवणुकीची रक्कम ज्या खात्यामध्ये वळती झाली तो खातेधारक हा मु.पो चिका ता गुहला जि कैथल राज्य हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न करुन त्यास अटक करणे कामी सायबर तपास पथक हे तात्काळ हरियाणा येथे रवाना झाले तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीस दि. २२/०४/२०२३ रोजी चिका पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये अटक करण्यात आली आहे सदर आरोपी कडे दाखल गुन्ह्याच्या अनुशंगाने अधिक तपास चालु असुन त्याच्या सोबत काम करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी चालु आहे

दाखल गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री अभय महाजन दत्तवाडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ श्री सुहेलशर्मा मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री राजेंद्र गलांडे मा वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तवाडी पोस्टे श्री अभय महाजन पोलीस निरिक्षक गुन्हे दत्तवाडी पोस्टे श्री विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर तपास पथकातील श्री अक्षय सरवदे, पोलीस उपनिरिक्षक पोना काशीनाथ कोळेकर अंमलदार जगदिश खेडकर, अनुप पंडित प्रसाद पोतदार यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

17 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

18 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

20 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

21 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 day ago