दत्तवाडी पोलीस स्टेशन तपासपथकांची धडाकेबाज कामगिरी..गावठी पिस्टल जवळ बाळगणा-या सराईत गुन्हेगारास अटक

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वरिष्ठांचे सुचनांनुसार पुणे शहरातील अवैद्य हत्यारे, अग्नीशस्त्रे बाळगणा-यांवर सक्त कारवाई करण्याच्या आदेशानुसार दि. २६/०४/२०२३ रोजी दत्तवाडी पोलीस ठाणेचे तपास पथक दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल दबड़े व अमित बिव्हे यांना बातमी मिळाली की एक इसम सर्व्हे नं. १३२ येथील महालक्ष्मी बिल्डींगच्या जवळील वसाहतीचे रोडवर येथे थांबला असून, त्याने त्याचे अंगात चॉकलेटी रंगाचा फुल बाहयांचा शर्ट व काळी पॅन्ट घातली असुन त्याच्या कंबरेला पिस्टल आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली..

सदरची बातमी ही वरिष्ठ पोलीस निरिक्षक अभय महाजन व पोलीस निरिक्षक, (गुन्हे), विजय खोमणे यांना कळवून त्यांचे आदेशाने पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत कामठे यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जावून सोबतचे स्टाफचे मदतीने सापळा रचुन आरोपी ऊर्फ पॅडी सुरेश म्हस्के, वय १९ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, सिध्दार्थ कंपनीजवळ, सर्व्हे नं १३२, सिंहगड रोड, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक देशी बनावटीचे पिस्टल ३०,०००/-रू किमतीचे जप्त करण्यात आले असून, त्याचेविरुध्द दत्तवाडी पो. स्टे. येथे गु.र.नं. १२०/२०२३, भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५) मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदरचा आरोपी हा दत्तवाडी पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपी याने तो पिस्टल केवळ हौसेसाठी जवळ बाळगलेचे तपासात निष्पन्न झाले आहे, सदर पिस्टल त्याला देणा-यांची माहिती पोलीस घेत असून, त्यादृष्टीने पुढील सखोल चौकशी सुरु आहे. गुन्हयांचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत…

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. प्रविण पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परि ३ श्री. सुहेल शर्मा, मा. राहा. पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग, श्री. राजेंद्र गलांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक, चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार, दयानंद तेलंगे-पाटील, अमोल दबडे, अमित विव्हे, अनिस तांबोळी, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, किशोर वळे, नवनाथ भोसले, सद्दाम शेख, प्रशांत शिंदे, प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

37 mins ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

20 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

20 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

23 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

23 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago