पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 55 लाखाच्या 162 दुचाकी जप्त, 17 जणांना अटक..

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

गुन्हे शाखा पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पुणे :- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 54 लाख 67 हजार रूपये किंमतीच्या 162 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक दुचाकी या युनिट 6 ने जप्त केल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे , गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे , सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार , सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी युनिट-6 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल आणि इतर अधि उपस्थित होते.

पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेस वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करून व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेतील युनिट- 6, युनिट – 5, युनिट – 4, युनिट-2 आणि दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-2 यांनी विशेष माहिम राबविण्यास सुरूवात केली होती.

गुन्हे शाखेतील युनिट-6 कडील पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय , पोलिस अंमलदार नितीन मुंडे आणि पोलिस अमंलदार सचिन पवार तसेच त्यांचे इतर सहकारी गेल्या एक महिन्यापासुन लातूर, धाराशिव, आणि बीड परिसरात वेशांतर करून गोपनियरित्या तपास करीत होते. त्यावेळी युनिट-6 च्या पथकास काहीजण हे धाराशिव जिल्हयातील गोविंदपुर (ता. कळंब) येथे चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने सचिन प्रदिप कदम (32, रा. देवधानोरा, ता. कळंब, जि. धाराशिव), अजय रमेशराव शेंडे (32, रा. मु.पो. सहजपुर म्हस्कोबा चौक, ता. दौंड, पुणे), पर भैरवनाथ मिसाळ ( 28, रा. गोविंदपुर कळंब, जि. धाराशिव) आणि युवराज सुदर्शन मुंढे (23, रा. गोविंदपुर) यांना अटक केली.त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता अजय शेंडे व शिवाजी गरड हे चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी देत असल्याचे समजले.ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया परवडेल व वापरासाठी उपयुक्त ठरतील अशा दुचाकी ते लोकांना विकत होते.

पोलिसांनी सखोल चौकशी करून त्यांच्याकडून एकुण 100 मोटारसायकली जप्त केल्या. आरोपी अजय शेंडेविरूध्द 15 गुन्हे दाखल आहेत.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर*

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…

2 hours ago

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

21 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

21 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

24 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

1 day ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

1 day ago