✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 28:- आज जील्हातील युवा तरुण पासून ते वृध्द नागरिक मोठ्या प्रमाणात आमली पदार्थाचे व्यसनी बनत आहे. या अमली पदार्थांपासून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दूर ठेवण्यासाठी या पदार्थांपासून होणारे दुष्परीणाम याबाबत शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी दिले.
वर्धा जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची सभा फुलझेले यांच्या अध्यक्षते खाली पार पाडली. बैठकीला श्री. फुलझेले यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे व पोलिस, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, अन्न व औषध प्रशासन, महिला व बाल विकास, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, कृषि, शिक्षण, समाज कल्याण, आरोग्य आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अमली पदार्थांचा वापर, वाहतुक, उत्पादन यावर निर्बंध घालुन यातील दोषींविरुध्द कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. गांजा व खसखसची अवैध लागवड होणार नाही याची काळजी घेणे, अमली पदार्थ विक्री करणा-या व्यक्तींवर कारवाई करणे. कुरीअरच्या माध्यमातून अमली पदार्थाची वाहतुक होऊ नये यासाठी कुरीअर चालकांचे प्रबोधन करणे व वाहतुक होत असल्यास कारवाई करणे यासाठी ही समिती कामकाज पाहते.
अमली पदार्थाचे व्यसन असलेल्या व्यक्तींना स्वयंसेवी संस्थेमार्फत यासापासुन परावृत्त करण्यासाठी उपाययोजना या समितीच्या माध्यमातून केल्या जातात. युवा पिढीला अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम, चर्चासत्र आयोजित करण्यात यावे असे श्री. फुलझेले यांनी यावेळी सांगितले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…