चंदननगर पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी, पुणे शहरामध्ये मोबाईल स्नॅचींग करणारे आरोपीस केले जेरबंद…

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पुणे :- चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अंमलदार शिवाजी धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव असे चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त करीत असताना त्यांना ज्युपीटर मो.नं. एमएच १२ एनसी २१२९ यावरील तीन इसमांचे हालचाली संशयीत दिसल्याने त्यांनी त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता, ते सदर ठिकाणी न थांबता, त्यांचेकडील गाडीवरून पळुन जावु लागले असता, त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवुन जागीच पकडून, नाव पत्ता विचारला त्यांनी त्यांचे नाव 1) ऋषभ मछिंद्र जाधव, वय १८ वर्षे, रा. लक्ष्मीनगर सोसायटी धानोरी, २) रोहीत रणविरसींग चिडार, वय २० वर्षे, रा. जयजवान नगर येरवडा, पुणे, ३) जयेश सतिश कांबळे, वय १८ वर्षे, रा. स्वागत हॉटेल जवळ, लेन नं. ३ विघ्नहर्ता कॉलणी मांजरी पुणे असे असल्याचे सांगितले..

वरील संशयीत इसमांची तसेच त्यांचे ताब्यातील गाडीची तपासणी केली असता त्यांचकडे दोन मोबाईल मिळुन आले. सदर मोबाईल बाबत त्या तिघांकडे सखोल तपास करता, एक मोबाईल हा विश्रामबाग पोलीस स्टेशनचे हद्दीत रोडने फोनवर बोलत पायी चालत जाणारे व्यक्तीचे हातातील मोबाईल फोन त्या तिघांनी त्यांचे ताब्यातील वरील मोपेड गाडीवरून हिसकावुन जबरी चोरी केल्याचे तर दुसरा मोबाईल हा येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीतुन त्या तिघांनी मिळून, त्यांचकडील मोपेड गाडीवरून हिसकावुन चोरी केल्याचे सांगितले त्याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. ८६/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२ व येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. २७५/२०२३ भा.द.वि. कलम ३९२ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजले आहे. तसेच ऋषम मछिद्र जाधव हा येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १५/२०२३ भा.दं.वि.क. ३२६, ५०४, ५०६, आर्म अॅक्ट ४ (२५), महा.पो.अधि. कलम ३७(१) (३) १३५. क्रिमीनल अॅमेंडमेंट कलम ३.७ या गुन्ह्यात दिनांक ०७/०१/२०२३ रोजी पासुन पाहीजे असलेला आरोपी आहे. वरील निष्पन्न आरोपी यांना संबंधीत पोलीस स्टेशनला वर्ग करण्याची तजवीज ठेवली आहे…

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सा श्री. रितेश कुमार पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त सो श्री. संदिप कर्णीक, पुणे शहर, मा. श्री रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. शशीकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त सो परि ४. पुणे शहर, सा. किशोर जाधव, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. जगन्नाथ जानकर न पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मुळुक, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सुहास निगडे, सचिन रणदिवे , महेश नाणेकर, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर , नामदेव गडदरे , सुभाष आव्हाड , विकास कदम यांनी कलेली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

19 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

23 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago