पीएमटी बस मध्ये गर्दिचा फायदा घेवुन प्रवाशांचे मोबाईल चोरटयांना केले जेरबंद आरोपींकडुन तब्बल २,७०,०००/- रु किचा मुददेमाल केला जप्त.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

मुंढवा पोलीस ठाणे पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन न्यूज :- दिनांक २७/०४/२०२३ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. लकड़े व पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. काकडे यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे व पोलीस अंमलदार असे मुंढवा पोलीस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीच्या गुन्हा रजि नं. १३९ / २३ भादविक ३७९ मधील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना,

मुंढवा तपास पथकातील पोलीस अंमलदार, दिनेश राणे व महेश पाठक यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम मुंढवा रेल्वे बीज खाली चोरीचे मोबाईल विक्रीसाठी रिक्षातुन घेवुन येणार आहेत.
सदरची बातमीची खाजी करुन मुंढवा वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांना • कळविले असता त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. मुंढवा तपास पथक अधिकारी, संदीप जोरे व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे हर्षल मनोज पांचाळ, वय- २१ वर्षे व त्याचा साथिदार २ इम्रान ताज शेख, वय २२ वर्षे दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे असणारे रिक्षाचे समोरील डीकी मध्ये वेग-वेगळ्या कंपनीचे एकुण १,७०,०००/- रु किमतीचे एकुण १५ मोबाइल मिळुन आले. सदर मोबाईलमध्ये मुढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. १३९ / २३ भादविक ३७९ मधील चोरीस गेलेला मोबाईल मिळुन आला. चोरीचा मोबाईल आरोपी यांनी मुंढवा चौकातुन शेल पंपा जवळील बस स्टॉपवरुन चोरल्याचे सांगितले.. त्यांचेकडे मिळुन आलेल्या इतर गोबाईल बाबत चौकशी केली असता, त्यांनी ते केशवनगर बस स्टॉप मुंढवा मधिल बस स्टॉप तसेच चंदननगर व हडपसर येथील पीएमटी बस स्टॉप वरुन चोरल्याचे सांगितले आहे. बाकी जप्त करण्यात आलेले १५ मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन पुढील कारवाईची तजवीज ठेवलेली आहे. अटक आरोपींकडे सखोल चौकशी चालु असुन अधिक मोबाईल मिळण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर, श्री बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप काकडे, मुंढवा तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, संदिप जोरे, तपास पथकातील पोलीस अंमलदार, दिनेश राणे, भांदुर्गे, वैभव मोरे, महेश पाठक, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, सचिन पाटील यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

1 min ago

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती दया ; खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत…

23 mins ago

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

16 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

17 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

18 hours ago