बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून फसवणूक करणारी टोळी गजाआड उत्तरप्रदेश मधील बनावट विधायकाची टोळी वानवडी पोलीसाच्या जाळ्यात

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626


वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पुणे :- वानवडी पोलीस ठाणे १९९ / २०२३ भा.दं.वि. कलम ४०६ ४२० १२० (ब), ५०६ (२) आणि भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) मधील फिर्यादी नामे गणेश सिंह इंद्रसिंग राजपुरोहीत वय ५४ वर्षे, धंदा. व्यवसाय, रा. फ्लॅट नं. ५२. ई-विंग, माऊंट ग्लोरी सोसायटी, खराडी, पुणे यांना महीला नामे रुपाली राऊत मॅडम, मंत्री असल्याचा बनाव करणारे संजयकुमार पांडे व त्यांचा ड्रायव्हर विकासकुमार रावत आणि हुबेहुब भारतीय चलनातील वाटणा-या नोटा देणारे इसम नामे समीर ऊर्फ विशाल घोगरे आणि अशोक पाटील रा. कोल्हापुर यांनी संगनमताने कट रचुन एकमेकांचे संपर्कात राहुन फिर्यादी यांना एसआरपीएफ ग्रुपजवळ, परमारनगर वानवडी पुणे येथे बोलावुन, तेथे बोलणे करुन ५,३४,०००/- रुपयांच्या बदल्यात हुबेहुब भारतीय चलनातील वाटणारे ३० लाख रुपये देण्याचे अमिष दाखवून त्याबाबतचा केमीकलचा वापर करून हुबेहुब नोटा बनविण्याचा डेमो त्यांनी दाखवुन त्याकरीता त्यांच्या मोठ्या ओळखी असल्याचे व त्यांचेतील संजयकुमार पांडे हे उत्तरप्रदेश विधानसभेचे विधायक असल्याचा बनाव करून विश्वास संपादन केला. व फिर्यादीकडुन दि.३०/०३/२०२३ रोजी १६/०० वा. ते दि. २०/०४/२०२३ रोजीपर्यंत एकूण ५,३४,०००/- रुपये रक्कम ही रोख स्वरुपात व ऑनलाईन स्वरुपात अकाऊंटवर घेवुन त्याचे तीनपट हुबेहुब भारतीय चलनातील वाटणारे एकुण ३०,००,०००/-रुपये परत देणार असल्याचे सांगीतले. परंतु त्यांनी ते पैसे परत न देता मुळ रक्कम ५,३४,०००/- रुपयेही परत केलेले नसुन, पैशाचा त्यांचे स्वतःचे फायद्यासाठी अपहार करून फिर्यादीची घोर आर्थिक फसवणुक केलेली आहे. तसेच दिलेले पैसे परत मागितले असता, त्यांनी त्यांचेकडील पिस्टलने जीवे ठार मारण्याची भिती घातली आहे. म्हणुन वरील प्रमाणे वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना दि. २७/०४/२०२३ रोजी पोलीस उप निरीक्षक संतोष सोनवणे यांना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून नमुद आरोपीतांचा शोध घेणेकामी नाशिक फाटा, पिंपरी चिंचवड, पुणे येथे स्टाफसह रवाना होवुन प्राप्त माहीतीचे आधारे ग्रीनफिल्ड सोसायटी, पिंपरी, पुणे येथे त्या सोसायटीमध्ये काही आरोपींची मिटींग चाललेली असल्याचे बातमीदाराकडुन बातमी मिळाल्याने स्टाफला सुचना देवून सर्वजन नमुद ग्रीनफिल्ड सोसायटीचे फ्लॅट नं. ३ येथे गेलो असता, नमुद फ्लॅटमध्ये एक महीला व दोन इसम मिळुन आले. त्यांना स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन आहे त्या स्थितीत ठेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) रुपाली सचिन राऊत वय ३६ वर्षे धंदा वास्तु कंन्सल्टींग रा. सध्या बी -२ बिल्डींग, फ्लॅट नं. ६०१ टाटाला मौडा सोसायटी, वडगाव मावळ फाटा, पुणे मुळ पत्ता- एम.एच.बी कॉलनी बिल्डींग ८. दुसरा मजला फ्लॅट नं २५८, बोरीवली वेस्ट, मुंबई २) संजय सोबरनलाल कुमार पांडे, वय ४० वर्ष, धंदा व्यवसाय, (ड्राय फ्रुट) मुळ पत्ता- लालारामनगर, एन्जल एमसु बिल्डींग गीता भवन इंदोर, मध्यप्रदेश. सध्याचा पत्ता- फ्लॅट नं. ३. ग्रीनफिल्ड सोसायटी, पिंपरी, पुणे व ३) विकासकुमार फुन्ना रावत, वय २७ वर्षे, चंदा ड्रायव्हर, रा. फ्लॅट नं. एफ-२३. अँजेल इग्लु बिल्डींग, गिता भवन, लालारामनगर, इंदोर, मध्यप्रदेश, सध्याचा पत्ता फ्लॅट नं. ३. ग्रीनफिल्ड सोसायटी, पिंपरी, पुणे अशी असल्याची सांगीतले. त्यावेळी त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना ताब्यात घेवुन वानवडी पोलीस ठाणे येथे आणून, त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे उकृष्टरित्या तपास करुन गुन्हयामध्ये – एक रिव्हॉलव्हर, १२ बुलेट, XUV300 चार चाकी गाडी, मोपेड दुचाकी, ६ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल, रोख रक्कम सह एकुण रू. १३.३८,०००/- चा मुददेमाल जप्त करणेत आलेले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि. ५. पुणे शहर श्री विक्रांत देशमुख व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, अजय भोसले, सपोफी/राजगे, पो. अंम अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, महेश गाढवे, राहुल गोसावी, संदिप साळवे, निलकंठ राठोड, विठ्ठल चोरमले, अमोल गायकवाड व महिला पो. अंम मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्टे हे करत आहेत.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

11 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

11 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

12 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

12 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

12 hours ago