चांगली पिढी घडविण्याचे शिंदे सरांचे कार्य कौतुकास्पद: आमदार सत्यजित तांबे

विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- शिक्षणाच्या माध्यमातून चांगली व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य शिंदे सर यांनी केले. आजची पिढी पाहता भविष्यात चांगले आदर्श नागरीक घडविण्याची जबाबदारी शिक्षकच स्विकारू शकतात. असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजीत तांबे यांनी केले. न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव येथील मुख्याध्यापक वसंत शिंदे सर यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की, या कार्यक्रमासाठी जमलेला हा जनसमुदाय शिंदे सरांच्या कार्याची पावती आहे. कारण त्यांनी हा पेक्षा व्यवसाय म्हणून नव्हे तर एक आवड म्हणून स्वीकारला होता. त्यांनी केवळ विद्यार्थीच घडविले नाहीत तर चांगली माणसे देखील जोडली. उत्तम संस्कारा मुळेच सरांचा चिरंजीव आज इथे उत्कृष्ट भाषण करू शकला. त्यांनी घेतलेल्या कष्टामुळेच आज त्यांची दोन्ही मुले चांगल्या प्रकारे आप आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मुलाच्या सेवा पूर्तीला आईची उपस्थिती असणे ही भाग्याची गोष्ट आहे. रयत मध्ये काम करणाऱ्या शिक्षकाची जनमानसात एक वेगळीच छाप पडत असते. भविष्यात देखील चांगल्या प्रकारची पिढी घडविण्याचे कार्य शिक्षकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या नोकरदारांना पेन्शनच टेन्शन आहे. परंतु त्यावर निश्चितच मार्ग काढू असे आश्वासन या प्रसंगी त्यांनी दिले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते. त्यांनी देखील सरांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रमोद तोरणे यांनी केले. या प्रसंगी सरांचे चिरंजीव श्री रामेश्वर शिंदे, दै. लोकमतचे पत्रकार माणिकराव उगले, ज्ञानेश्वर राजळे, सोनवणे सर, रमेशभाऊ शिंदे, पोपट पवार, साहेबराव गायकवाड, कानिफनाथ गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, सरांच्या पत्नी सौ छाया शिंदे, जनरल बॉडी सदस्य एम.टी. रोहमारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व सेवकवृंदातर्फे शाल, बुके, साडी, श्रीफळ, पोषाख, सन्मानपत्र व पिठाची चक्की देऊन शिंदे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सरांच्या मातोश्री गं.भा.छबुबाई शिंदे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.


यावेळी शिंदे कुटुंबाच्या वतीने देखील शिंदे सर यांचा सन्मानपत्र व साईबाबांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संजय तरटे, विद्या ब्राम्हणे, नानासाहेब मते, सर्जेराव मते, दै.सार्वमतचे पत्रकार महेंद्र जेजुरकर, अशोक जेजुरकर, चंद्रकांत चव्हाण, अशोक आहेर, रामेश्वर पाटोळे, भास्करराव झावरे, जालिंदर जोंधळे, दिलीप पाटील, रयत बँकेचे संचालक दिलीप डहाळे, प्रमोद घोलप, सुरेश गमे, मधुकर औताडे, संदीप पाटील, शशिकांत दाभाडे, भारत शिंदे, प्रतिक पाटील, अनिल नळे, मच्छिंद्र शिंदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिंदे कुटुंबातील श्री निरज शिंदे, ऋतुजा शिंदे, रोहिणी शिंदे तसेच जालिंदर गायकवाड, सखाराम शिंदे, ज्ञानेश्वर केदार, संतोष सोनवणे, सचिन चौधरी, कृष्णकांत अंत्रे, वामन घोडसरे, निर्मला लावरे, प्रतीक्षा थोरात, वृषाली बेल्हेकर, अर्चना हासे, कविता घोडसरे, लेखनिक सुनील बोठे, ग्रंथपाल संजय कडू, अनिल घोडेकर, राजाराम थोरात, विशाल त्रिभुवन, सुमन कणसे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष कदम व छाया जेजुरकर यांनी केले. तर किरण आंबेकर यांनी आभार मानले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

18 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

22 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago