खोटा निकाहनामा बनविणारा इम्रान शेख याचा साथीदार आरोपी नामे शेख खलील शेख जमील याला बुलढाणा येथुन केले अटक..

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

तक्रारदार नामे अल्फीया शरफुद्दीन शेख, वय २३ वर्षे रा खराडी पुणे यांचे नावाचा बनावाट निकाह नामा बनवुन, तो खरा असल्याचे भासवुन, मुस्लीम समाजामध्ये तक्रारदार यांची बदनामी केल्याचे अनुषंगाने तक्रारदार यांनी दिनांक २४/०७/२०२२ रोजी तक्रार दिले वरून चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. २६९ / २०२२ भा.द.वि. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१,५००,३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयामध्ये आरोपी नामे इम्रान शेख यास अटक करणेत आलेली असून, त्याचा साथीदार असलेला. पाहिजे आरोपी नामे शेख खलील शेख जमील याचा गेल्या ९ महिन्यापासून शोध चालु होता. नमुद आरोपी हा वारंवार राहण्याचे ठिकाण तसेच मोबाईल क्रमांक बदलुन, औरंगाबाद, जालना या भागांत फिरत होता.

सदर पाहिजे आरोपी याचा गोपनीय बातमीदार तसेच तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपास करून, सदर आरोपी हा चिखली, बुलढाणा येथे असल्याची माहीती मिळाल्याने सदर आरोपीचा शोध घेणे करीता पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, पोलीस अंमलदार सचिन रणदिवे, नामदेव गडदरे यांचे पथक चिखली बुलढाणा येथे रवाना होवुन सदर आरोपी नामे शेख खलील शेख जमील, वय-३० वर्षे, रा- अमदापुर, ता-चिखली, बुलढाणा यास दि. २९/०४/२०२३ रोजी चिखली पोलीस स्टेशन, बुलढाणा येथुन ताब्यात घेवुन त्यास अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. शशीकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ-४ पुणे शहर, मा. किशोर जाधव, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो. चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो. चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी गोरक्ष घोडके, पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, सचिन रणदिवे, संतोष लवटे यांनी केली असुन

सदर गुन्हाचा पुढील तपास गोरक्ष घोडके, पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

काँग्रेस पक्षाकडून उपचारासाठी आर्थिक मदत

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…

16 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा पाठपुरवाला यश : वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत समस्या दूर.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली कॉलनी येथील विद्युत…

16 hours ago

उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांनी प्रत्यक्ष घेतली दखल.

वंचितचे आष्टीत "रास्ता रोको आंदोलन मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809. राष्ट्रीय महामार्ग…

19 hours ago

सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेतली*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 *कुरखेडा :-* राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम जास्त…

19 hours ago

महामार्ग क्र 63 ला राष्ट्रीय महामार्ग राष्टीय हायवे मध्ये समाविष्ट करण्याची मागणी*

* तहसील दार मार्फत मा. नितिनजी गडकरी.रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार यांना निवेदन ..…

23 hours ago

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चींचोलकर कुटुंबांची सांत्वन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…

23 hours ago